Arshi Khan, angry at Sky Datlani, said in front of everyone 'Vedpath'! | आकाश ददलानीवर संतापली अर्शी खान, सर्वांसमोर म्हटले ‘वेडपट’!

टीव्हीवरील बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन ११ मध्ये आपल्या अदांनी चर्चेत राहणारी अर्शी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर अर्शी बिग बॉस हा शो संपला असतानाही कुठल्या ना कुठल्या कारणाने लाइमलाइटमध्ये राहत आहे. कधी तिच्या फोटोशूट तर कधी उलटसुलट वक्तव्यांमुळे ती सातत्याने समोर येत आहे. दरम्यान, आता अर्शीचा एक व्हिडीओ समोर आला असून, ज्यामध्ये ती आकाश ददलानीसोबत बघावयास मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अर्शी आकाशवर चांगलीच संतापलेली दिसत आहे. एवढेच काय तर त्याला ती सर्वांसमोर चक्क वेडपट म्हणताना दिसत आहे. व्हिडीओत अर्शी पत्रकारांशी संवाद साधताना दिसत आहे. 

अर्शी बीसीएल मॅचच्या प्रॅक्टिसनंतर मीडियाशी संवाद साधत असते. जेव्हा ती मीडियाच्या माइकसमोर बाइट देण्यासाठी उभी राहते, त्याचवेळी आकाश तिच्याजवळ येतो अन् तिच्या गळ्यात पडतो. ही बाब अर्शीला चांगलीच खटकते. ती त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करते. परंतु आकाश तिला अगोदर स्माइल दे, असा हट्ट करतो. मात्र अर्शीला आकाशचा हा बावळटपटा अजिबातच आवडत नाही. इच्छा नसतानाही ती आकाशला स्माइल देते. त्यानंतर आकाश तेथून निघून जातो. मात्र लगेचच ती त्याच्याकडे रागाने बघते. यावेळी आकाश अर्शीला विचारतो की, ‘आवाम क्या जानती है’ त्यावर अर्शी म्हणते आवाम सब जानती है!यावेळी अर्शीला आकाशची कंपनी खूपच त्रस्त करताना दिसते. जेव्हा आकाश तेथून निघून जातो तेव्हा पत्रकार त्याला विचारतात की, आकाशविषयी तू काय विचार करतेस? त्यावर अर्शी म्हणते की, ‘बहुत पागल है’ हे म्हणताना अर्शीच्या चेहºयावर राग स्पष्टपणे दिसून येतो. 
Web Title: Arshi Khan, angry at Sky Datlani, said in front of everyone 'Vedpath'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.