Arjun Bijlani will be the first time host of dance-crazy | अर्जुन बिजलानी डांस दीवाने मधून प्रथमच होस्ट बनणार

'डान्स दीवाने नावाचा' एक नवीन डान्स रिअॅलिटी शो घेऊन येत आहे.या शोचा होस्ट म्हणून लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीला चॅनेलने घेतले आहे. अर्जुन कलर्सच्या इश्क में मरजावां मध्ये प्रमुख भूमिकेतसुद्धा आहे.या शोचा मुख्य युएसपी आहे की यात तीन श्रेणीचे स्पर्धक सहभागी होणार आहेत, मुले, तरुण आणि प्रौढ.सर्व स्पर्धक त्यांच्या त्यांच्या श्रेणीत स्पर्धा करणार आहेत, आणि प्रत्येक श्रेणीतील एक असे तीन स्पर्धक ट्रॉफिसाठी लढणार आहे. शोसाठी ऑडिशन सध्या सुरू आहेत.याविषयी बोलताना, अर्जुन म्हणाला, “माझ्या कडे ही एक मोठी संधी चालून आली आहे आणि या प्रवासाला जाण्यासाठी मी उत्सुक आहे. अशा लक्षवेधक रिअॅलिटी शो चा होस्ट बनण्याचे माझे स्वप्न होते आणि ते आता खरे होत आहे. एक कलाकार म्हणून विकसित होण्यात ही संधी मला मदत करेल असे मला वाटते.जून मध्ये प्रसारित होणाऱ्या या शो मध्ये माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि प्रख्यात दिग्दर्शक शशांक खेतान परीक्षक म्हणून पहायला मिळणार आहेत.


लहानपणापासून प्रत्येकाला आपण एखाद्या ठरावीक क्षेत्रात करियर करावे असे वाटत असते.लहान मुलांना तुला काय बनायचे आहे असे विचारले तर ते सर्रास उत्तर डॉक्टर, वकील, पोलिस, शिक्षक यांपैकी एक दिले जाते.अर्जुन बिजलानी आज एक प्रसिद्ध अभिनता असला तरी त्याला लहानपणी कधीच अभिनता बनायचे नव्हते. त्याला लहानपणी कोणी तुला काय बनायचे आहे असे विचारले तर तो मला पोलिस बनायचे आहे असेच सांगायचा. त्याला लहानपणापासूनच चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड आहे. चित्रपटात आणि मालिकांमध्ये पोलिस वाईट लोकांसोबत दोन हात कशाप्रकारे करतात ते पाहून त्यालादेखील पोलिस बनण्याची इच्छा होती. याविषयी अर्जुन सांगतो, "लहान असताना पोलिस अधिकारीच व्हायचे असे मी मनाशी ठरवले होते. पोलिसांचा पेहराव, ते गुंडांना कशाप्रकारे मारतात हे पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहात असत. मला चित्रपटातील कोणत्याही भूमिकेपेक्षा पोलिसांची भूमिका अधिक आवडत असे. पण मी मोठा झाल्यानंतर पोलिस बनायचा विचार सोडून दिला मी अभिनयाकडे वळलो. मी जर अभिनेता बनलो नसतो तर नक्कीच पोलिस अधिकारी बनलो असतो."
Web Title: Arjun Bijlani will be the first time host of dance-crazy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.