अरबाज खान व मलायका अरोरा येणार एकत्र! हा शो करणार जज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 10:54 AM2019-03-04T10:54:48+5:302019-03-04T10:55:35+5:30

अरबाज खान व मलायका अरोरा कायदेशीररित्या विभक्त होऊन बराच काळ लोटलाय. दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. अरबाज खान  एका विदेशी बालेच्या प्रेमात आहे तर मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालीय. अशात एक नवी बातमी आहे.

arbaaz khan and malaika arora will be seen as a judge in nach baliye 9 | अरबाज खान व मलायका अरोरा येणार एकत्र! हा शो करणार जज!!

अरबाज खान व मलायका अरोरा येणार एकत्र! हा शो करणार जज!!

googlenewsNext
ठळक मुद्देअरबाजने या आॅफरसाठी होकार दिला आहे. तर मलायकाने मात्र विचार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला आहे. अशात मलायका एक्स हसबण्डसोबत हा शो जज करणार की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. 

अरबाज खानमलायका अरोरा कायदेशीररित्या विभक्त होऊन बराच काळ लोटलाय. दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. अरबाज खान  एका विदेशी बालेच्या प्रेमात आहे तर मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालीय. अशात एक नवी बातमी आहे. होय, अरबाज व मलायका दोघेही लवकरच एका टीव्ही शोसाठी एकत्र येऊ शकतात, असे कळतेय. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, अरबाज व मलायका टीव्हीवरचा लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘नच बलिए’चे जज म्हणून दिसू शकतात.

आम्ही यापूवी  दिलेल्या बातमीनुसार, यंदाच्या ‘नच बलिए’च्या सीझनमध्ये एक नवा टिष्ट्वस्ट पाहायला मिळणार आहे. त्यानुसार,एका नव्या अंदाजात हा नवा शो लॉन्च होणार आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये टीव्हीच्या सुप्रसिद्ध जोड्या वा विवाहित कपल्स दिसलेत. पण यावेळी शोला नवा तडका देत, ब्रेकअप झालेल्या जोड्या ‘नच बलिए’च्या मंचावर थिरकताना दिसतील. म्हणजेच, शोचे स्पर्धक आपल्या एक्स गर्लफ्रेन्ड वा एक्स बॉयफ्रेन्डसोबत दिसतील. अर्थात अद्याप याबाबतची घोषणा व्हायचीय. पण लवकरच ही घोषणा होईल असे कळतेय.  त्यामुळे हे सीझन अरबाज व मलायका या एक्स-कपलने जज करावे, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजने या आॅफरसाठी होकार दिला आहे. तर मलायकाने मात्र विचार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला आहे. अशात मलायका एक्स हसबण्डसोबत हा शो जज करणार की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. 
 ‘नच बलिए’च्या मागच्या सीझनमध्ये दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया, आश्का गोराडिया-ब्रेंट गोबल, सनाया इराणी-मोहित सहगल, भारती सिंग-हर्ष लिम्बाचिया, दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम सारख्या सेलिब्रिटी जोड्यांनी धूम केली होती.  दिव्यांका व विवेक या सीझनचे विजेते ठरले होते.

Web Title: arbaaz khan and malaika arora will be seen as a judge in nach baliye 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.