‘कृष्णा चली लंडन’च्या सेटवर अनुपम श्यामचा खट्याळपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:59 PM2018-11-19T16:59:26+5:302018-11-19T17:08:13+5:30

अनुपम श्याम ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत शुक्ला यांचे मोठे भाऊ म्हणजेच बडे पापाची भूमिका निभावताना दिसणार आहेत.

Anupam Shyam's knock on the sets of 'Krishna Chali London' | ‘कृष्णा चली लंडन’च्या सेटवर अनुपम श्यामचा खट्याळपणा

‘कृष्णा चली लंडन’च्या सेटवर अनुपम श्यामचा खट्याळपणा

googlenewsNext
ठळक मुद्देअनुपम श्याम दिसणार शुक्ला कुटुंबातील बडे पापाच्या भूमिकेत

स्टार प्लसवरील 'कृष्णा चली लंडन' मालिकेत बडे पापांच्या भूमिकेद्वारे अनुपम श्यामच्या प्रवेशामुळे शुक्ला कुटुंबियांमध्ये उलथापालथ घडत असून बडे पापा आपला कुटिल हेतू साध्य करण्यात यशस्वी ठरतील अशी चिन्हे आहेत. पण पडद्यामागे मात्र हा खलनायक सेटवर इतरांची मिश्किल फिरकी घेताना दिसत आहेत आणि सर्वजण त्यावर खुश आहेत,
असे दिसते. 
सेटवरील एका सूत्राने सांगितले, सेटवर अनुपम श्याम हा सतत कुणाची न कुणाची चेष्टामस्करी करीत असतात आणि खोड्या काढत असतात. पण त्याबद्दल मालिकेतील त्याचे सहकलाकार किंवा कर्मचारी यांची काही तक्रार नसते. त्याची मस्करी ही निर्मळ मनाने केलेली असते आणि त्यामुळे सेटवरील वातावरणही हलकेफुलके होते. त्यामुळे त्यांचे सहकलाकारही ही मस्करी मजेत स्वीकारतात. ते अनुपमवर मनापासून प्रेम करतात. सेटवर अनुपम हे सर्वांचे लाडके आहेत आणि त्यांच्या मस्करीत सर्वचजण आनंदाने सहभागी होतात.
‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील भूमिकेद्वारे अनुपम श्यामला पुन्हा एकदा टीव्हीच्या पडद्यावर पाहून मन प्रसन्न झाले. त्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्याकडे खिळवून ठेवले आहे. आता कथानकाला मिळणाऱ्या नव्या कलाटण्यांमुळे प्रेक्षकांची मालिकेतील उत्कंठा वाढणार असून पुढे काय घडेल, याची त्यांना उत्सुकता लागेल.
'कृष्णा चली लंडन' २१ वर्षीय देखण्या राधेलालची कथा आहे.त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते ते म्हणजे लग्न करणे! राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो. कृष्णा मात्र महत्त्वाकांक्षी असते आणि तिला सारे जग पाहायचे असते.
 

Web Title: Anupam Shyam's knock on the sets of 'Krishna Chali London'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.