Another TV show, in love, will be arrested next year | आणखी एक टीव्ही कपल प्रेमात,पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात


'इश्कबाज' मालिकेत अभिनेता कुणाल जयसिंग  ओमकारा सिंग ओबेरॉयची भूमिका साकरत आहे. डॅशिंग लूक आणि अभिनयामुळे त्याने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे.सध्या कुणाल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे तो त्याची सहकलाकार भारती कुमारच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा  आहेत.दोघंही एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत. दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे. एक उत्तम सहकलाकार म्हणून तिच्यासोबत काम करायला मज्जा येते आणि आपण फक्त चांगले मित्र आहोत असं कुणाल सांगत असतो.आम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत मात्र ते प्रेमाच्या नात्याने नसून तर मैत्रीच्या नात्याने असे भारतीने स्पष्ट केले आहे.दोघांची ओळख इश्कबाज मालिकेच्याच सेटवर झाली त्यामुळे सेटवर इतरांनाही त्यांच्या प्रेमात असल्याची गुड न्युज न सांगताच समजली असल्याचे सांगितले. दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगल्या असताना  २०१८ साली दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या नात्याची कल्पना आहे.त्यामुळे लग्नाच्या चर्चा सुरू असताना घरच्यांनी आधीच लग्नासाठी होकारही दिला असल्याचे समजते आहे.'इश्कबाज'या मालिकेच्या सेटवर सध्या प्रेमाची जादू पाहायला मिळत आहे. लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती सेटवर निर्माण झाली आहे.

'इश्कबाज' मालिकेत विविध ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिकेतील रंगत आणखी वाढणार आहे. ओबेरॉय बंधूंच्या जीवनावर अधिक झोत टाकणारी ‘दिल बोले ओबेरॉय' मालिकेचा 'इश्कबाज 'हा विस्तारित भाग आहे.इश्कबाज या मालिकेतील आगामी भागांमध्ये शिवाय म्हणजेच नकुल मेहता आणि अन्निका म्हणजेच सुरभी चंदना ओबेरॉय मॅन्शन सोडणार आहेत. रामायणामध्ये राम आणि सीता ज्याप्रकारे वनवासाला गेले होते, त्याचप्रमाणे हे जोडपे वनवासाला जाणार आहे. ही जोडी आपल्या घरच्यांपासून दूर जाऊन आपले आयुष्य नव्याने सुरू करणार आहे. शिवाय-अन्निका हे वनवासात गेल्यानंतर ओबेरॉय परिवारातील प्रत्येक व्यक्तिरेखा रामायणातील एक पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच मालिकेत रितू शिवपुरीची एंट्री होणार आहे.
Web Title: Another TV show, in love, will be arrested next year
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.