As Ankit Mohan clicked with Kareena Kapoor Selfie! | म्हणून अंकित मोहनने करिना कपूरसह क्लिक केला सेल्फी!

वीरे दि वेडिंग मधील- करीना कपूर, सोनम कपूर आहुजा, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या चार सेन्सेशनल अभिनेत्रींनी 'नागिन ३'च्या कलाकारां सोबत नुकतेच चित्रीकरण केले.कलर्सच्या नागिन 3 मध्ये युवीची भूमिका साकारणारा अंकित मोहन करीना कपूरचा जबरदस्त चाहता आहे आणि या विशेष सिक्वेन्स साठी या सुपरस्टार सोबत चित्रीकरण करताना तो अतिशय उत्तेजित झाला होता. “मी करीना कपूर खानचा जबरदस्त प्रशंसक आहे आणि मला तिचे सिनेमा पहायला खूप आवडतात. तिची स्क्रिन वरील उपस्थिती दिमाखदार असते. मी तिच्या सौंदर्यावर नेहमीच मोहित होतो पण आता ती किती साधी आणि प्रेमळ आहे हे जाणवल्यानंतर मला ती अजूनच आवडू लागली आहे. या विशेष एकत्रीकरणाचे चित्रीकरण करताना त्यासाठी तिने मला सहज केले. हा एक गंमतीदार सिक्वेन्स होता आणि मला तिच्या सोबत भविष्यातही चित्रीकरण करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.” म्हणाला अंकित. 


एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'मिले जब हम तुम', 'घर आजा परदेसी', 'महाभारत', 'कुमकुम भाग्य' यांसारख्या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या. आता तो एकता कपूरच्या प्रसिद्ध 'नागिन ३' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.त्याच्यासोबत या मालिकेत सुरभी ज्योती, पर्ल व्ही पुरी, पवित्रा पुनिया, अनिता हंसनंदानी, रक्षंदा खान यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तसेच करिश्मा तन्ना देखील या मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे. अंकितची या मालिकेत काय भूमिका असणार आहे याबाबत अंकितने मौन राखणेच पसंत केले आहे. पण अंकितने याआधी देखील बालाजी टेलिफ्लिम्स सोबत काम केले होते. त्याने एकताच्या कुमकुम भाग्य या मालिकेत एक प्रमुख भूमिका साकारली होती.कुमकुम भाग्य या मालिकेला खूप चांगला टिआरपी आहे आणि त्यात अंकित साकारत असलेली भूमिका महत्त्वाची होती. तरीही त्याने इतकी चांगली मालिका का सोडली हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण रुपेरी पडद्यावर करियर करण्यासाठी त्याने छोट्या पडद्यावर काही दिवसांचा ब्रेक घेतला असल्याचे कळतेय.अंकित त्याच्या या नवीन चित्रपटावर खूप मेहनत घेत असून तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. विशेष म्हणजे अंकित हा अमराठी असल्याने त्याला मराठी बोलता येत नाही. पण त्याने या भूमिकेसाठी मराठीचे धडेदेखील गिरवले आहेत. अंकितने अभिनेत्री रुची सवर्णसोबत लग्न केले आहे. रुचीला अस्खलित मराठी बोलता येते. तसेच तिने सखी या मराठी मालिकेत काम केले आहे. तिनेच अंकितला मराठी शिकण्यासाठी मदत केली आहे.
Web Title: As Ankit Mohan clicked with Kareena Kapoor Selfie!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.