Anjali Anand Fida on Mohit Malik! | मोहित मलिकवर अंजली आनंद फिदा!

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.या मालिकेतील सर्व कलाकारांवर प्रेक्षक खुश आहेत.त्यात लव्हली आणि सिकंदर या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार अनुक्रमे अंजली आनंद आणि मोहित मलिक यांचाही समावेश आहे.मालिकेत या दोन कलाकारांमध्ये पती-पत्नीचे नाते असले,तरी त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याचे दाखविण्यात आले आहे.परंतु वास्तव जीवनात या दोघांमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे.आपल्या या देखण्या सहकलाकारावर (मोहित मलिक) अंजली आनंद फिदा झाली असल्याचे आमच्या कानावर आले आहे.ओ- हो,पण यातून कोणी भलताच अर्थ काढू नये, बरं का! वास्तविक या मालिकेत भूमिका साकारण्यापूर्वीपासून अंजली आणि मोहित हे एकमेकांना ओळखतात. पूर्वी ‘ढाई किलो प्रेम’ या मालिकेतील मेहेरझान माझ्दाने या दोघांची ओळख करून दिली होती. टीव्ही मालिकेत आपली व्यक्तिरेखा मोहित ज्या सहजतेने उभी करतो, त्याबद्दल अंजलीला मोहितचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे.पण ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत तो साकारत असलेल्या रॉकस्टार सिकंदरच्या भूमिकेला एक वेगळेच आकर्षक वलय असल्याने अंजली आनंदला मोहितची स्तुती करण्यावाचून राहावत नाहीये.अंजली आनंदने सांगितले, “मोहितने या मालिकेत सिकंदरची भूमिका ज्या अफलातून प्रकारे उभी केली आहे,ते पाहिल्यावर माझं मन त्याच्याकडे आकर्षित होत आहे.”

cnxoldfiles/a>यामुळे मालिकेची टीम तिच्यावर प्रचंड खूश झाली होती. याविषयी आकृती सांगते, “मालिकेत प्रत्येक भागात मला एक गाणे गायचे असल्याने साहजिकच मला दररोज एक गाणे पाठ करावे लागणार आहे. आम्ही मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ केल्यानंतर मला पहिल्या आठवड्यासाठी सात आणि शिवाय मालिकेचे शीर्षकगीत अशी आठ गाणी पाठ करावी लागली होती. त्यामुळे माझी आई मला रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सेटवर मी तयार होत असताना गाण्याचे ध्वनिमुद्रण ऐकवत असे. त्यामुळे ही गाणी लक्षात ठेवणे मला सोपे गेले.”'कुल्फीकुमार बाजेवाला' या मालिकेत आकृतीसोबतच अंजली आनंद, पल्लवी राव, मेहुल बुच आणि श्रृती शर्मा असे अनेक नामवंत कलाकार प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Web Title: Anjali Anand Fida on Mohit Malik!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.