Anita Hansandani's Bridal Loke comes in front, while the other cat sparks | अनिता हंसनंदानीचा ब्राइडल लूक आला समोर,तर वेगळ्याच चर्चांना उधाण

सध्या सोशल मीडियावरील अनिताचा एक फोटो सा-यांसाठीच चर्चेचा विषय ठरतो आहे. विशेषतः तिच्या फॅन्ससाठी आनिताचा हा फोटो उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या फोटोत अनिता एका नववधूप्रमाणे नटून बसल्याचे पाहायला मिळते आहे.आकर्षक अशी साडी, डोक्यावर मोठी बिंदी, नाकात भली मोठी नथ, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा अवतारात अनिता पाहायला मिळते आहे.या अवतारात अनिताचं सौंदर्य खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. अनिता एका खुर्चीवर निवांत बसून चेह-यावर आठ्या पाडून बसल्याचे पाहायला मिळत आहे. आता फोटो नेमका कधीचा आणि कसला आहे अशा चर्चा सुरु आहेत. या फोटोचं वास्तव काय असे अनेक प्रश्न सध्या तिच्या फॅन्सना पडले आहेत.तर खास कारण आहे ते म्हणजे नागिनचा तिसरा सिझन लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.यात अनिता नागिनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.'नागिन 3' मधला अनिताचा लूक आहे.अनिताच्या या लूकमुळे अनेकांनी अनिता पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकली की काय? असे प्रश्न विचारले होते.मात्र यांवर अनितानेही काही स्पष्टीकरण दिले नव्हते.काही दिवसांपूर्वीच 'नागिन 3' झळकणारे कलाकारांची यादी समोर आली होती.यंदाच्या सिझनमध्ये करिश्मा तन्ना,सुरभी ज्योती, पर्ल व्ही पुरी, पवित्रा पुनिया,रक्षंदा,अंकित मोहन, खान यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.समकालीन आणि आधुनिक थीम वर आधारीत, तरिश्मा तन्ना आणि अनिता हसनंदानी प्लम आणि लाल पोशाखात दिसणार आहेत आणि नागिणी म्हणून त्या अतिशय आकर्षक दिसणार आहेत.'नागिन' अवतारात या दोघी अतिशय मोहक तर दिसतच आहेत शिवाय नागिनच्या चाहत्यांना आनंद होण्याचे अजून वेगळे कारण आहे.टेलिव्हिजन वरील देखणा हंक रजत टोकस सुध्दा आकार बदलणाऱ्या 'नागिन' भूमिकेत दिसणार आहे.
या मालिकेच्या प्रमोशनच्या दरम्यान एकताने दिलेल्या एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. सलमान आणि शाहरुखसारख्या मोठ्या स्टारसोबत आजवर तिने काम का नाही केले याबाबत तिने सांगितले आहे.एकता ही आज आघाडीच्या निर्मात्यांपैकी एक असली तरी शाहरुख, सलमानला आजवर तिच्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळालेले नाही. मोठ्या स्टारसोबत एकता काम करण्याचे का टाळतेय याविषयी ती सांगते, मला मोठ्या स्टार्ससोबत काम करायचे नाहीये किंवा मला कोणत्या मोठ्या स्टारसोबत काही वैयक्तिक समस्या आहे असे नाहीये. माझे सगळ्याच स्टार्ससोबतचे संबंध खूपच चांगले आहेत. पण सलमान, शाहरुख सारखे स्टार म्हटले की, त्यांचे शेड्युल हे नेहमीच व्यग्र असते आणि त्यातही मी देखील प्रचंड बिझी असते. त्यामुळे त्या स्टारच्या आणि माझ्या तारखा जुळणे हे खूप कठीण काम आहे. त्यामुळेच मी आजवर शाहरुख किंवा सलमानसोबत काम केलेले नाही. शाहरुख किंवा सलमानसोबत काम करायचे झाल्यास माझे सहा महिने तरी केवळ प्लानिंग बनवण्यातच जातील असे मला वाटते. 

Web Title: Anita Hansandani's Bridal Loke comes in front, while the other cat sparks
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.