अंगूरी भाभीने नृत्‍याच्‍या माध्‍यमातून या दिग्‍गज अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 07:00 PM2018-12-29T19:00:00+5:302018-12-29T19:00:02+5:30

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणेच &TV वरील 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील गोड आणि साधीभोळी अंगुरी भाभी एक दमदार परफॉर्मन्‍स सादर असणार आहे.

Angoori Bhabhi aka shubhangi atre’s dance tribute to the legendary Sridevi | अंगूरी भाभीने नृत्‍याच्‍या माध्‍यमातून या दिग्‍गज अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली

अंगूरी भाभीने नृत्‍याच्‍या माध्‍यमातून या दिग्‍गज अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext
ठळक मुद्दे ती आयकॉनिक आणि दिग्‍गज अभिनेत्री श्रीदेवी यांना तिच्या परफॉर्मन्सद्वारे श्रद्धांजली वाहणार आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करत शुभांगी 'तेरे मेरे होठो पे', 'काटे नही कटते', 'मोरनी बाघा मा' या श्रीदेवी यांच्या लोकप्रिय गाण्‍यांवर थिरकणार आहे.

सर्वजण अगदी जल्‍लोषात नववर्षाचे स्‍वागत करतात. प्रत्येकाचे नववर्षं सेलिब्रेशनचे बेत ठरलेले असतात. काहीजण बाहेर जाऊन इतरांसोबत आनंद साजरा करतात, तर काहीजणांना आपल्‍या मित्र-परिवारांसोबत घरामध्‍येच त्‍यांच्‍या आवडीचे कार्यक्रम बघत आनंद साजरा करायला आवडते. यंदाच्‍या नववर्ष स्‍वागतादरम्‍यान तुमच्‍या आवडत्‍या व्‍यक्‍तींना बोलवा आणि टीव्‍हीचा रिमोट दूर ठेवा. कारण &TV चॅनेल सादर करत आहे एक मनोरंजनपूर्ण सायंकाळ 'शाम शानदार'. टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार काही लोकप्रिय गाण्‍यांवर विविध अॅक्‍ट्स सादर करणार आहेत. तसेच विविध कलाकार काही मनोरंजनपूर्ण परफॉर्मन्‍स सादर करणार आहेत.

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणेच &TV वरील 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील गोड आणि साधीभोळी अंगुरी भाभी एक दमदार परफॉर्मन्‍स सादर असणार आहे. ती आयकॉनिक आणि दिग्‍गज अभिनेत्री श्रीदेवी यांना तिच्या परफॉर्मन्सद्वारे श्रद्धांजली वाहणार आहे. या दिग्‍गज अभिनेत्रीच्‍या काही लोकप्रिय गाण्‍यांवरील परफॉर्मन्‍ससह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करत शुभांगी 'तेरे मेरे होठो पे', 'काटे नही कटते', 'मोरनी बाघा मा' आणि 'मेरे हाथो में नौ नौ चुडियॉं' अशा लोकप्रिय गाण्‍यांवर थिरकताना दिसणार आहे. परफॉर्मन्स सादर करण्‍यासाठी काहीशी नर्वस असलेली शुभांगी सांगते, ''हिंदी चित्रपटसृष्‍टीतील आयकॉनिक आणि दिग्‍गज अभिनेत्री श्रीदेवीजी यांना मानवंदना वाहण्‍यासोबतच त्‍यांच्‍या गाण्‍यांवर परफॉर्म करण्‍याची संधी मिळाल्‍याने मला खूपच आनंद झाला आहे. मी त्‍यांचा अभिनय पाहत आणि त्‍यांच्‍या कामातून प्रेरणा घेत मोठी झाली आहे. त्‍या सौंदर्यवती असण्‍यासोबतच एक उत्‍तम कलाकार आणि परफॉर्मर आहेत. त्‍यांना मानवंदना देण्‍याची संधी मिळाल्‍याने मला खूप आनंद होत आहे. मी त्‍यांना मानवंदना वाहण्‍यासाठी अत्‍यंत उत्‍सुक आहे. मी आशा करते की, प्रेक्षक आणि चाहत्‍यांना माझा परफॉर्मन्‍स नक्कीच आवडेल.'' 

अंगूरी भाभीसाठी ही निश्चितच शानदार संध्याकाळ असणार आहे. प्रेक्षकांना 'शाम शानदार' हा कार्यक्रम २९ आणि ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता &TV वर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Angoori Bhabhi aka shubhangi atre’s dance tribute to the legendary Sridevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.