Amitabh Bachchan started filming Kaun Banega Crorepati | ​अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या चित्रीकरणाला केली सुरुवात

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरचा आजवरचा सगळ्यात यशस्वी कार्यक्रम आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने अमिताभ बच्चन यांना छोट्या पडद्यावरदेखील तेवढीच लोकप्रियता मिळवून दिली. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच प्रेक्षकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहाता या कार्यक्रमाचा नववा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नवव्या सिझनची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या सिझनमध्ये काही गोष्टी नव्याने पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या लाइफ लाइनमध्ये देखील नावीण्य असणार आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या काही सिझनचे सूत्रसंचालन शाहरुख खानने देखील केले होते. पण प्रेक्षकांना अमिताभ बच्चन यांचेच सूत्रसंचालन अधिक आवडते. नवव्या सिझनमध्ये देखील अमिताभ बच्चनच आपल्याला सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन यांनी चित्रीकरण करायला देखील सुरुवात केली आहे. तब्बल दोन वर्षांच्या ब्रेकनंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू झाले असल्याचे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे. अमिताभ बच्चन हे सध्या पहिल्या भागाचे चित्रीकरण करण्यापूर्वी तालीम करत आहेत. त्यांनी या तालमीचे फोटो पोस्ट केले असून त्यात एक भव्य सेट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रीकरणाचा माझा पहिला दिवस असून त्यातील काही फोटो तुमच्यासाठी पोस्ट करत आहे असे त्यांनी म्हटले आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी कौन बनेगा करोडपतीच्या सतरा वर्षांच्या आठवणींना आम्ही उजाळा दिला असे देखील त्यांनी फोटोसोबत लिहिले आहे.  

Also Read : ‘केबीसी’चा पहिला प्रोमो आउट; महानायकांनी केली ‘ही’ घोषणा!
Web Title: Amitabh Bachchan started filming Kaun Banega Crorepati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.