आलोक शॉ दिसणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 06:30 AM2018-12-16T06:30:00+5:302018-12-16T06:30:00+5:30

कर्लसवर लवकरच केसरी नंदन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत वडील-मुलगी यांचे नाते, आईचे प्रेम आणि भावाने निरपेक्ष भावनेने बहिणीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी केलेली मदत यावर भाष्य करण्यात येणार आहे

Alok Shaw will appear in this serial | आलोक शॉ दिसणार 'या' मालिकेत

आलोक शॉ दिसणार 'या' मालिकेत

googlenewsNext
ठळक मुद्देहनुमंतच्या मोठ्या मुलाची जगतची भूमिका आलोक शॉ करणार आहेया शॉच्या माध्यमातून तो मालिकेमध्ये पदार्पण करतो आहे

कर्लसवर लवकरच केसरी नंदन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत वडील-मुलगी यांचे नाते, आईचे प्रेम आणि भावाने निरपेक्ष भावनेने बहिणीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी केलेली मदत यावर भाष्य करण्यात येणार आहे.  केसरी नंदनमध्ये केसरी नावाच्या  मुलीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. ही भूमिका चाहत तेवानीने साकारत आहे, तिचे स्वप्न आहे तिचे वडील हनुमंत यांनी कुस्तीपटू व्हावे. केसर सर्व अडथळ्यांवर मात करणार आहे आणि जिंकण्यासाठी धैर्य दाखविणार आहे. हनुमंतचे एकमेव स्वप्न आहे त्यांच्या मुलाने त्यांचा चमकदार वारसा पुढे न्यावा आणि देशासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकावे. यात हनुमंतच्या मोठ्या मुलाची जगतची भूमिका आलोक शॉ करणार आहे. या शॉच्या माध्यमातून तो मालिकेमध्ये पदार्पण करतो आहे. 
 
आपल्या भूमिकेबाबत बोलताना आलोक शॉ म्हणाला, “डान्स दिवाने संपल्यानंतर लगेच मला ही संधी मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. मी केसरीच्या मोठ्या भावाची भूमिका करत आहे, जगतची जो त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत आहे. केसरवर जगतचे जास्त प्रेम आहे आणि त्याची सर्व स्वप्ने व महत्वाकांक्षा तो तिला सांगत असतो. हा माझ्यासाठी अतिशय वेगळा अनुभव आहे आणि मी त्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. प्रोमोच्या चित्रीकरणासाठी नुकतेच आम्ही जैसलमेरला गेलो होतो आणि तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. शोचे सर्व कलाकार अतिशय प्रेमळ आहेत आणि आम्ही सर्वजण सेटवर खूप सारी मजा करत असतो.”

Web Title: Alok Shaw will appear in this serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.