Alia Bhattan in High Fever gave emotional message to her mother | हाय फिवरमध्ये आलिया भट्टने दिला तिच्या आईसाठी भावनिक संदेश

'हाय फिवर...डान्स का नया तेवर' हा रिअॅलिटी शो सुरुवातीपासूनच यशाच्या शिखरावर आहे. स्पर्धकांची असामान्य कामगिरी आणि वेगवेगळ्या पाहुण्या परीक्षकांची उपस्थिती यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात या शोला कधीच अपयश आले नाही.यंदाच्या आठवड्यात खास मदर्स डे साजरा केला जाणार आहे.त्यात स्पर्धक आणि परीक्षक भावनिक झालेले दिसतील. त्यांनी आपल्या आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.अशा खास कार्यक्रमाला तारांकित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विकी कौशल या नृत्योत्सवात आपल्या मनातील भावना व्यक्त करणार आहेत. 

हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करीत असताना मदर्स डेबाबत पाहुणी परीक्षक आलिया भट्टचा एक वेगळाच दृष्टिकोन दिसून आला.तिचे विचार व्यक्त करताना आलिया म्हणाली, “मदर्स डे हा माझ्यासाठी असा एक दिवस आहे, ज्या दिवशी मला मदर्स डेची भरपूर शुभेच्छा पत्रे पाहायला मिळतात.पण मला असे वाटते की मदर्स डे हा फक्त एका दिवसात साजरा करण्याचा उत्सव नसून तो दररोज साजरा व्हायला हवा.आम्ही नेहमीच या दिवसाकडे इतर दिवसांप्रमाणेच पाहतो. आपल्याला आपल्या आईसाठी वेळ काढायलाच हवा. मला नाही वाटत की आई आपल्यासाठी जे काही करते त्यासाठी एखादा दिवस आणि एखाद्या उत्सवाचे मूल्य पुरेसं ठरेल.”

आलिया भट्ट लवकरच तिच्या 'राजी' चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मोठ्या पडद्यावरील आई आणि मुलीच्या चित्रीकरणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी दर्शक या चित्रीकरणावेळी उपस्थिती राहणार आहेत.आपल्या आईसोबतच काम करीत असल्याबद्दल आलिया म्हणाली, “मला माझ्या आईसोबत अधिक वेळ घालवण्याची संधीच मिळत नाही. तिच्यासाठी वेळ काढणे माझ्यासाठी खूपच कठीण जाते. त्यामुळे मला त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. राझीच्या माध्यमातून मला तिच्यासोबत सलग आठ दिवस वेळ घालवणे शक्य झाले. कारण, मी तिच्यासोबतच काम करीत होते आणि ती या चित्रपटात माझ्या आईचीच भूमिका साकारत आहे.” ती असेही म्हणाली, “खरंतर मी माझ्या आईबाबत खूपच चिंतेत होते आणि अपेक्षा करीत होते की तिला संवादाच्या नीट आठवतील. मला तिला सर्वोत्कृष्ट पाहायचे होते. परंतु, मी विसरलेच होते की आईला चित्रपटांबाबत माझ्यापेक्षाही अधिक अनुभव आहे.”    

“मै बिल्कूल उनकी तरह हूँ ! मी आणि माझी आई कायमच बोलत असतो की आम्ही एखाद्या जुळ्यांप्रमाणे वाटतो. कारण, तिच्या आणि माझ्या बोलण्याची पद्धत सारखीच आहे.” ती अभिमानाने म्हणाली. आलिया भट्ट हिने तिच्या आईसाठी एक गोड संदेशही समर्पित केला. “मी तुझी खूप आभारी आहे आणि क्षमस्व आहे त्या क्षणांसाठी, ज्या वेळी मी तुझ्यावर चिडले आणि रागावले. माझे तुझ्यावरील प्रेम दाखवण्यासाठी हा माझा एक मार्ग आहे. मेरी डाँट भी मेरा प्यार है ”, असेही ती गमतीने म्हणते.
Web Title: Alia Bhattan in High Fever gave emotional message to her mother
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.