Alia Bhatla says something new! | आलिया भटला म्हणते कुछ बात नयी!

स्टारप्लस वाहिनीने नेहमीच नवीन विचार आणि समाजामधील नवीन संवाद यांना पाठिंबा दिला आहे.ह्याच विचारासह आजच्या तरूण आधुनिक भारताचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या नवीन आणि विभिन्न प्रकारच्या शोज्‌सह स्टारप्लस सुद्धा आपल्यात नावीन्य घेऊन येत आहे.नवीन स्टारप्लस आपल्या विभिन्न भावनांसह केवळ प्रेक्षकांच्या अंगावर रोमांचच उभे करणार नाही तर त्यांना नातेसंबंध आणि आयुष्याकडेही पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन प्रदान करेल आणि आणेल नयी कहानियां जिनमें है कुछ नयी बात.

आपल्या नवीन अवतारात ही वाहिनी सर्व प्रकारांमध्ये विभिन्न प्रकारचे कथानक,विभिन्न कार्यक्रम आणि व्यक्तिरेखा आणत आहे, जे अख्ख्या परिवारामध्ये विभिन्न भावना जागृत करेल. सबसे स्मार्ट कौनमध्ये सामान्य ज्ञानाच्या आधारावर जिंकण्याची संधी प्रेक्षकांना निश्चितपणे रोमांचित करेल, तर 'कुल्फी कुमार बाजेवाला' मधील छोटी मुलगी कुल्फीची कथा प्रेक्षकांच्या हृदयाची तार छेडेल. मरियम खान रिपोर्टिंग लाईव्हमधील मरियमची निरागसता प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करून जाईल तर 'कृष्णा चली लंडन'मधील साधासुधा मुलगा राधे याच्या आगळ्या वेगळ्या कल्पनेने प्रेक्षकांना भारावून टाकेल.


ह्या भावनेला अनुसरून देशातील सर्वांत हुशार आणि डायनॅमिक युथ आयकॉन्सपैकी एक आलिया भट्ट ही चॅनलच्या ब्रॅन्ड कॅम्पेनच्या नवीन चेहऱ्याच्या रूपात झळकेल.ही तरूण आणि गुणी अभिनेत्री स्टारप्लस च्या नवीन गीतामध्ये दिसून येईल.ह्या नवीन स्टारप्लसच्या  रोमांचक दुनियेमध्ये पाऊल ठेवताच तिला अनेक कार्यक्रम आणि व्यक्तिरेखांसह विभिन्न भावनांचा अनुभव येतो. ती प्रेक्षकांनाही आपल्यासोबत घेऊन जाईल आणि अनुभवेल ह्या नयी नयी कहानियां जिस में है कुछ नयी बात. 

आलिया भट्ट म्हणाली,“ह्या ब्रॅन्ड आणि माझ्यामधील सारखेपणामुळे मी स्टार प्लससोबत सहभागी होण्यास तयार झाले.आम्ही दोघेही आमचे परिवार, मित्र आणि नातेसंबंधांना खूप महत्त्व देतो आणि त्यांचे महत्त्व जाणतो.” ती पुढे असेही म्हणाली, “अतिशय खऱ्या आणि आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखांसह स्टारप्लस वर जे अनेक नवीन कार्यक्रम सुरू होत आहेत त्याबद्दल मी अतिशय उत्साहित आहे. मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह, कुल्फी कुमार बाजेवाला आणि कृष्णा चली लंदन सारख्या मालिका नातेसंबंध आणि भावनांना अधोरेखित करतात, तर सबसे स्मार्ट कौन सारखी अनोखी संकल्पना सामान्य लोकांच्या हुशारीला दाद देईल. ह्या शोज्‌सोबत स्टारप्लस आपल्या आयुष्याला गेल्या दोन दशकांप्रमाणेच स्पर्श करत राहिल याची मला खात्री आहे.”

सुनिधी चौहान आणि चांदनी आरएमडब्लू यांनी गायलेले स्टारप्लस गीत राम संपथ यांनी स्वरबद्ध केले असून शब्द राष्ट्रीय पुरस्कार विजेता स्वानंद किरकिरे यांचे आहे.नवीन लोगो हा ट्रेडमार्क लाल क्रिस्टल सितारा असून त्यावर स्वूश आहे. हा स्वूश आहे सोनेरी रंगाचा, ज्यातून सकारात्मकता, ताजेपणा आणि नात्यांचे सेलिब्रेशन दिसून येते.नवीन ब्रॅन्ड ओळखीतून भविष्याची ऊबदार, सुंदर आणि सकारात्मक दृष्टीकोन दिसून येते. आपला जादुई स्पर्श प्रदान करत ऑस्कर विजेता ए आर रेहमान यांनी खास ब्रॅन्डसाठी सिग्नेचर धून बनवली आहे.ए आर रेहमान म्हणाले, “स्टारप्लस साठी नवीन ध्वनी ओळख निर्माण करताना मी हे लक्षात ठेवलं होतं की हे काहीतरी संस्मरणीय,अभिनव आणि ऊबेची जाणीव निर्माण करणारं असायला हवं. स्टारप्लस वर दाखवण्यात येणाऱ्या विभिन्न व्यक्तिरेखांचा सुंदर प्रवास टिपत याची चाल तरूण, उत्साहित करणारी आणि आनंददायी असावी असे मला वाटले.”
Web Title: Alia Bhatla says something new!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.