Akshaye Deodhar is the person's contribution to my success | ​अक्षया देवधर सांगतेय माझ्या यशात आहे या व्यक्तीचा वाटा

अक्षया देवधर सध्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अंजलीची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करत आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच अक्षयाची व्यक्तिरेखा, तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अंजली आणि राणाची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अक्षयाने खूपच कमी वेळात छोट्या पडद्यावर तिची एक जागा निर्माण केली आहे. अक्षयाने मिळावलेल्या यशात एका खास व्यक्तीचा हात असल्याचे अक्षयाचे म्हणणे आहे. 
अक्षयाच्या आजवरच्या यशामध्ये कोणाचा हात आहे हे स्वतःच अक्षयाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. अक्षयाच्या यशात ज्याचा हिस्सा आहे, तो तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा लेखक आहे. अक्षयाने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात तिच्या मालिकेच्या टीमसोबत काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. या मालिकेच्या टीमने त्यावेळी खूपच मजा-मस्ती केली होती. याच मजा मस्तीचा एक फोटो अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अक्षयाच्या मागे आपल्याला एक व्यक्ती उभी असलेली दिसून येत आहे. या फोटो सोबत तिने एक खूप छान पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा फोटो ब्लर आहे पण खूप सूचक आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका मी करण्यास कारणीभूत असणारा एक व्यक्ती, जो पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सतत माझ्या मागे असाच उभा आहे तो म्हणजे सुबोध खानोलकर... आज मी जे काही थोडे फार अॅचिव्ह करू शकले, त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. तू ग्रेट आहेस दादा...तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

akshaya deodhar

तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा लेखक सुबोध खानोलकरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयाने ही पोस्ट लिहिली होती. अक्षयाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप सारे लाइक्स दिले असून अनेकांनी या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 
अक्षया देवधर तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या या अकाऊंटला तिचे अनेक चाहाते फॉलो करतात. 

Also Read : तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरने सुयश टिळकसोबत साजरा केला पाडवा
Web Title: Akshaye Deodhar is the person's contribution to my success
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.