Akshay Kumar's 'Gold', another TV actress to be seen in the film | अक्षय कुमारच्या 'गोल्ड' या सिनेमात झळकणार आणखी एक टीव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील कलाकारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललीय.सिनेमातील कलाकारांप्रमाणेच टीव्ही कलाकारांना रसिकांकडून भरभरुन प्रेममिळतंय.त्यांची ही लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी बॉलिवूडचे निर्मातेही छोट्या पडद्यावरील कलाकारांना सिनेमासाठी अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अर्थात हा ट्रेंड काही आता सुरू झालेला नाहीय.पूर्वीपासून अनेक कलाकार छोटा पडदा गाजवल्यानंतर मोठ्या पडद्याकडे वळले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्या कलाकारांनी मालिका गाजवल्यानंतर सिनेमातही आपल्या विशेष भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. आता या यादीत मौनी रॉयचेही नाव मोडले जाणार आहे. हे आधीच सर्वांना माहित आहे. अक्षय कुमारच्या सिनेमात मौनी रॉय झळकणार आहे.त्यामुळे सध्या छोटा पडदा गाजवल्यानंतर रूपेरी पडद्यावर मौनी रॉय काय कमाल करणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.मात्र गोल्ड सिनेमात झळकणारी मौनी रॉयही एकमेव टीव्ही अभिनेत्री नाहीय.होय, गोल्ड सिनेमात मौनीसह आणखी एक टीव्ही अभिनेत्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे 'एक दुजे के वास्ते' या मालिकेतील निकीता दत्ता या सिनेमात झळकणार आहे. निकिता या सिनेमात विकी कौशलचा भाऊ सनी कौशलसोबत झळकणार आहे.सिनेमातील तिच्या भूमिकेविषयी निकीताने काही सांगितले नाही. निकीताचा गोल्ड हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा  निकीताने या अगोदरही 2014 साली आलेल्या 'लेकर हम दिवाना दिन' या सिनेमात  काम केले होते.अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' बॉक्स ऑफिसवर अजूनही बिझेनस करताना दिसतोय. गेल्या पाच वर्षातील अक्षयचे सगळे रेकॉर्ड या सिनेमाने तोडले आहेत. तसेच सिनेमासोबतच अक्षयकुमार छोट्या पडद्यावरील शो  द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन 9 मध्ये बिझी आहे. शोमध्ये अक्षय कुमार सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहे.तुर्तास अक्षय कुमार गोल्ड सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे.हा सिनेमा 15 ऑगस्ट 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Also Read:SEE PHOTO: निया शर्मा नव्हे तर मौनी रॉय आहे अधिक बोल्ड

Web Title: Akshay Kumar's 'Gold', another TV actress to be seen in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.