Akshay Kumar scared of twinkle khanna confesses in the kapil sharma show | अक्षय कुमार सर्वात जास्त घाबरतो या व्यक्तीला... द कपिल शर्मा शो मध्ये त्यानेच दिली कबुली
अक्षय कुमार सर्वात जास्त घाबरतो या व्यक्तीला... द कपिल शर्मा शो मध्ये त्यानेच दिली कबुली

ठळक मुद्देअक्षय म्हणाला, मी सगळ्यात जास्त माझ्या पत्नीला घाबरतो आणि त्यानंतर मेरी गो राऊंडसारख्या राईट्सना... मला उंच राईड्समध्ये बसायला नेहमीच भीती वाटते. कारण या राईड्समधून ज्यावेळी आपण वरून खाली येतो त्यावेळी खूपच वाईट अवस्था होते.

कपिलचा द कपिल शर्मा शोचा दुसरा भाग प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील टिकून आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात लवकरच प्रदर्शित होणाऱ्या केसरी या चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा कपिलच्या शो मध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासोबतच कपिल आणि त्याच्या टीमसोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात आलेल्या अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा या आपल्या पाहुण्यांना कपिल विचारणार आहे की, प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते... तर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? यावर अक्षयने दिलेले उत्तर ऐकून उपस्थितांना आपले हसू आवरत नव्हते. कारण अक्षय म्हणाला, मी सगळ्यात जास्त माझ्या पत्नीला घाबरतो आणि त्यानंतर मेरी गो राऊंडसारख्या राईट्सना... मला उंच राईड्समध्ये बसायला नेहमीच भीती वाटते. कारण या राईड्समधून ज्यावेळी आपण वरून खाली येतो त्यावेळी खूपच वाईट अवस्था होते. 

कपिलच्या या प्रश्नावर उत्तर देताना परिणितीने सांगितले की, मला सापांची खूप भीती वाटते. त्यांना पाहून मी अस्वस्थ होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी माझ्या जवळच्या सगळ्याच लोकांना सांगून ठेवले आहे की, त्यांनी सापांच्या बाबतीत असलेले विनोद देखील मला सांगायचे नाही. एकदा मला माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने सापांच्या संबंधित एक विनोद सांगितला होता. हा विनोद ऐकताना मला अक्षरशः चक्कर आली होती. यावरूनच मी सापाला किती घाबरते हे तुमच्या लक्षात येईल. 

द कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, रोचेल राव यांसारखे पहिल्या सिझनमधील कलाकार तर भारती सिंग, कृष्णा अभिषेक यांसारखे नवीन कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. 


Web Title: Akshay Kumar scared of twinkle khanna confesses in the kapil sharma show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.