Ajay Devgn to be seen as guest artist on small screen | छोट्या पडद्यावर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार अजय देवगण

टीव्हीवर आजपर्यंत उपहासात्मक विनोदी मालिका प्रसारित झाल्या असल्या तरी राजकीय विडंबन करणारी मालिका क्वचितच प्रसारित झाली आहे.आपले राजकीय नेते सामान्य माणसाला कशी पोकळ आश्वासने देतात,त्याचे चित्रण करणार-या ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत प्रभावीपणे करण्यात आले आहे.आता या मालिकेत बॉलीवूडचा सुपरस्टार अजय देवगण एका पाहुण्या कलाकाराची भूमिका रंगविणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांचा अजय देवगण हा शिष्य असून धीर यांनी दिग्दर्शित केलेल्या “अतिथी, तुम कब जाओगे”, “सन ऑफ सरदार”,“यू, मी और हम” यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अजयने प्रमुख भूमिका साकारली आहे.निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “अश्विनी धीर यांच्याशी अजयचे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर जवळचे वैयक्तिक संबंधही आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी अजय हा त्यांची पहिली निवड होता. त्यांचा अजयच्या क्षमतेवर विश्वास असून त्याच्याकडून या मालिकेला खूप योगदान मिळेल, असं त्यांना वाटतं.”हिंदी चित्रपटांतील त्यांच्या नात्यामुळे ही जोडी आता छोट्या पडद्यावरही धमाल करण्यास सिध्द झाली असून प्रेक्षकांना एक नवी विनोदी मालिका पाहायला मिळणार आहे.अश्विनी धीर हे ह्या वाहिनीसोबत प्रेक्षकांसमोर ह्या शो च्या माध्यमातून राजकीय विडंबन सादर करणार आहेत. सामान्य माणसांच्या समस्यांकडे साधारणपणे कोणाचे लक्ष जात नाही, पण शोमधून त्यांना विनोदी पद्धतीने टिपण्यात आले आहे. कॉमेडियन राजीव निगम हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावरील विनोदांसाठी आणि सामान्य माणसाच्या वाट्‌याला येणाऱ्या समस्यांना विनोदी पद्धतीने माडण्यासाठी मानले जातात, ते ह्या शोमध्ये प्रमुख भूमिका निभावणार आहेत. राजीव अतिशय उत्साहाने म्हणाले, “होय मी ह्या शो चा हिस्सा आहे आणि प्रमुख भूमिका निभावणार आहे.मी अश्विनी धीर यांचा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांच्यासोबत काम करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो'' असे त्याने सांगितले.कॉमेडियन राजीव निगम या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.राजीव सामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यात निर्माण होणारे विनोद सादर करणार आहे.

Web Title: Ajay Devgn to be seen as guest artist on small screen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.