Ajay Devgn and Akshay Kumar will come together after 12 years! | 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि अक्षय कुमार येणार एकत्र !

अजय देवगण सध्या आपला आगामी चित्रपट 'गोलमाल अगेन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट रिलीजपासून अगदी काहीच दिवस दूर आहे. अजय सध्या गोलमालच्या टीमसोबत प्रमोशनासाठी अनेक रिअॅलिटी शोच्या सेटवर हजेरी लावताना दिसतो आहे.  काही दिवसांपूर्वीच अजय देवगणने सलमान खानच्या बिग बॉस 11मध्ये हजेरी लावली होती. अजय देवगणसोबत चित्रपटाची संपूर्ण टीम बिग बॉसच्या घरात गेली होती तिकडे यालोकांनी फार मस्तीसुद्धा केली. मीडिया रिपोर्टनुसार अजय  देवगण आपला मित्र अक्षय कुमारचा शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये सुद्धा जाणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर  वाचलात अजय देवगण प्रमोशनची एक ही संधी सोडायला तयार नाही आहे. ज्यासाठी तो अक्षय कुमारच्या शोमध्ये लवकरच दिसणार आहे.   

अजय आणि अक्षय कुमार शेवटचे 2005 साली आलेल्या इंसान चित्रपटात एकत्र दिसले होते. यानंतर आजपर्यंत दोघे एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाही. एकटा अजय देवगण नाही तर तब्बू सुद्धा तब्बल 17 वर्षानंतर अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तब्बू आणि अक्षय हेरा फेरीमध्ये एकत्र काम केले होते. याचबरोबर तब्बू अक्षय कुमारसोबत सुपरहिट गाणं हम दो प्रेमीवर परफॉर्म करताना दिसू शकते. एवढा वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय कुमार आणि तब्बू हे फक्त दोनच चित्रपट एकत्र दिसले होते. तू चोर मैं सिपाही आणि हेरा फेरीमध्ये दोघांची सुपरहिट जोडी एकत्र दिसली होती. 

ALSO READ :  'गोलमाल अगेन' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी केला हा विक्रम

रोहित शेट्टीचा गोलमाल अगेनचा ट्रेलर 24 तासांपेक्षा कमी वेळात  २० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला असल्याचा विक्रम या चित्रपटाने नोंदवला आहे. हा गोलमाल सीरिजचा चौथा चित्रपट आहे. याआधी आलेले गोलमाल सीरिजचे सगळचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेले आहेत. त्यामुले रोहित शेट्टीला त्याच्या याही चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. गोलमाल अगेनमध्ये अजय देवगण सोबत तब्बू, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, परिणिती चोप्रा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तब्बू आणि परिणीती पहिल्यांदाच गोलमालच्या सीरिजमध्ये झळकणार आहे.  
Web Title: Ajay Devgn and Akshay Kumar will come together after 12 years!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.