Ajay-Atul was impressed by Indian idol contestant nilanjana | या चिमुरडीच्या गायनाने प्रभावित झाले अजय-अतुल
या चिमुरडीच्या गायनाने प्रभावित झाले अजय-अतुल

देशात सणासुदीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि या उत्सवी वातावरणात इंडियन आयडल 10 या कार्यक्रमात एक खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इंडियन आयडल हा सर्वात मोठा संगीत रिअॅलिटी शोच्या आगामी भागात महा-गणपती विशेष भाग प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. मराठी मनोरंजन दुनियेतील नामवंत संगीतकार जोडी अजय-अतुल या कार्यक्रमात नुकतेच आले होते आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील या कार्यक्रमात गाणार्‍या स्पर्धकांच्या गायनाचा दर्जा पाहून ते खूप प्रभावित झाले.

१५ वर्षांची स्पर्धक नीलांजना राय आपल्या सुमधुर गायनाने सर्वांना भारावून टाकत आहे आणि देशभरातून तिचे कौतुक होत आहे. हसतमुख अशा नीलांजनाने ‘साथिया क्या किया’ आणि अजय अतुलने संगीतबद्ध केलेले ‘सैराट झालं जी’ ही गाणी म्हटली. नीलांजनाने ज्या नेमकेपणाने आणि बारकाव्यांनी गाणी म्हटली, ते पाहून हे दोघे संगीतकार थक्क झाले आणि त्यांनी तिचे तोंडभरून कौतुक केले!

तिचे गाणे ऐकून प्रभावित झालेले अजय आणि अतुल म्हणाले, “तुझ्या गाण्यावर श्रेया घोषालच्या गायनाचा प्रभाव दिसतो. हे गाणे खरंच खूप अवघड आहे आणि तू ज्या प्रकारे ते गायलेस ते अद्भुत होते. इतक्या लहान वयात, तुझ्यात असलेले स्टेजचे भान अप्रतिम आहे. तुझ्या आवाजात पार्श्वगायनाचे गुण आहेत. संगीत क्षेत्रात तुझे करियर नक्कीच उज्ज्वल असेल.”

शिवाय, नीलांजनाने अजयला सुप्रसिद्ध मराठी गाणे, ‘जीव रंगला दंगला’ म्हणण्याची विनंती केली आणि अजयने त्या विनंतीला मान देऊन तिच्यासोबत ते गाणे म्हटले. अजय-अतुल सांगतात की, “जीव रंगला दंगला” हे गाणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी लोकसंगीताला मिळालेला हा पुरस्कार होता, जी आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. गेल्या 56 वर्षात मराठी चित्रपट संगीताला मिळालेला हा पहिला सन्मान होता.”

नीलांजना या कोलकाताच्या स्पर्धकाने इंडियन आयडल 10च्या सेटवर पहिल्यांदाच मराठी गाणे गायले. तिच्यासाठी हा अनुभव खूपच छान होता. 


Web Title: Ajay-Atul was impressed by Indian idol contestant nilanjana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.