Aishwarya Kale, who lives in Bigg Boss house, shocked the bus ... | ​बिग बॉस मराठीच्या घरात असणाऱ्या अस्ताद काळेला बसला धक्का... तो बिग बॉसच्या घरात असताना प्रेयसीचे ठरले लग्न

अस्ताद काळे सरस्वती या मालिकेत राघव ही भूमिका साकारत होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत होती. या मालिकेतील त्याची आणि सरस्वतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. अस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता अस्ताद एका रिअॅलिटी शो कडे वळला आहे.
अस्तादने त्याच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या मालिकांना, त्यामधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे. आता अस्ताद बिग बॉस मराठी या कार्यक्रमात झळकत असून त्याला त्याच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अस्ताद बिग बॉस मराठीच्या घरात गेल्यामुळे त्याला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत असले तरी बिग बॉसच्या घरात असताना अस्तादला एक चांगलाच धक्का बसला आहे. अस्ताद त्याचे खाजगी आयुष्य नेहमीच मीडियापासून दूर ठेवतो. पण अस्तादच्या आयुष्यात स्वप्नाली नावाची एक मुलगी असल्याचे त्याने बिग बॉसच्या घरात नुकतेच सांगितले होते. पण अस्तादने त्यांची ही खाजगी गोष्ट जगजाहीर केली असल्याने त्याची प्रेयसी चिडली असल्याचे नुकतेच अस्तादने हर्षदा खानविलकर, जुई गडकरी आणि मेघा धाडे यांना सांगितले. एवढेच नव्हे तर आस्तादने हर्षदा, जुई, मेघा यांना एक चिठ्ठी घरातून आल्याचे सांगितले तसेच फोन आल्याचे देखील सांगितले. ज्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड स्वप्नालीचे लग्न ठरणार असल्याचे सांगितले. अस्तादच्या खासगी आयुष्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली असल्याने तो कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाऊ शकतो असे देखील त्याला बिग बॉसकडून सांगण्यात आले आहे आणि यासाठी त्याला चोवीस तासांचा अवधी देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता अस्ताद काय निर्णय घेतो? तसेच अस्ताद हर्षदा, जुई आणि मेधाला खरं सांगतोय की एखाद्या टास्कचा हा भाग आहे हे प्रेक्षकांना या कार्यक्रमातच पाहायला मिळणार आहे. 

Also Read : ​या कारणामुळे हर्षदा खानविलकरच्या आईने तिच्यासोबत धरला होता अबोला
Web Title: Aishwarya Kale, who lives in Bigg Boss house, shocked the bus ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.