Again, this actress made the clean, bold, glamorous photoshoot done to the fans | पुन्हा या अभिनेत्रीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड,ग्लॅमरस अंदाजात केले फोटोशूट

करिश्माने 'ये है मोहब्बतें' सोबतच 'पवित्र रिश्ता', 'फियर फाइल्स : डर की सच्ची तस्वीरें', 'आहट' आणि 'सिलसिला प्यार का' सारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.मात्र तिला खरी लोकप्रियता मिळाली ती 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' या वेब सीरिजमुळे.यामधील तिचे काम लक्षवेधी ठरले.मुळात यात ती बोल्ड अवतारात पाहायला मिळाली.त्यानंतर आता करिश्मा जे काही काम करते त्याची चर्चा होतेच.आता पुन्हा करिश्मा चर्चेत आली आहे.त्याला कारण ठरले आहे तिचे हे नवीन फोटोशूट.या प्रत्येक फोटोमध्ये करिश्माचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर करिश्माचा हे फोटोशूट सध्या सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे.  या फोटोंनाही रसिकांची तितकीच चांगली पसंती मिळत आहे.

एकताने या वेबसिरीजसाठी हॉट अ‍ॅण्ड बोल्ड करिश्मा शर्माची निवड केली होती, तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, ही वेबसिरीज अगोदरच्या तुलनेत अधिक बोल्ड असेल. त्यातच करिश्माने ज्या पद्धतीने पोस्टर्सपासून टीजरपर्यंत आपल्या हॉट अदा दाखविल्या, त्यावरून प्रेक्षकांना सध्या या वेबसिरीजचे वेध लागले आहेत. आता या वेबसिरीजचे दुसरे टीजर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्येही सेक्स आणि बोल्डनेसचा तडका लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

बॉलिवूड सेलिब्रेटी असो किंवा मग टीव्ही सेलिब्रेटी स्वतःला मनोरंजन आणि झगमगाटाच्या दुनियेत चमकण्यासाठी नको त्या गोष्टी करताना दिसतात. मग ते बोल्डनेस असो किंवा वादग्रस्त विधानं. अशा काही गोष्टी केल्या की चर्चा तर होणारच हे समीकरण पक्कच आहे. काही करून प्रसिद्धी मिळवून बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. आतापर्यंत केवळ आपल्या बोल्ड लूकने कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणा-या अनेक अभिनेत्रींची उदाहरणं आपल्याला माहिती आहे.आता याच यादीत आणखीन एका सेलिब्रेटींचे नाव मोडले गेले आहे.तिने  बोल्ड फोटोशूट शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'ये हैं मोहब्बते' या मालिकेत आणि एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' या वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री करिश्मा शर्मा सध्या याच बोल्ड आणि सेक्सी फोटोमुळे जास्त चर्चेत आली आहे. 

Web Title: Again, this actress made the clean, bold, glamorous photoshoot done to the fans
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.