After the threat of Salman Khan, Jubair Khan shot in the house of Bigg Boss, admitted to the hospital! | ​सलमान खानच्या धमकीनंतर ‘बिग बॉस’च्या घरात जुबैर खानने खाल्ल्या गोळ्या, रूग्णालयात दाखल!

‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक घटना घडल्याचे वृत्त आहे. शनिवारी वीकेंडला टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानने घरवाल्यांचा चांगलाच क्लास घेतला. पण यासर्वांत कंटेस्टंट जुबैर खान याच्यावर सलमान चांगलाच संतापला. ‘ जब तुम यहां आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी.  यह किसी का दामाद नहीं है. जिस परिवार से यह अपना नाम जोड़ता है इसका उससे कोई लेना-देना नहीं है.  अपनी औकात दिखानी है न तो निकाल गंदगी मेरे सामने. जुबैर यहां अपनी इमेज बनाने आया है या इमेज डुबाने आया है,’असे सलमान नॅशनल टीव्हीवर जुबैरला बोलला. यानंतर आज सकाळी ‘बिग बॉस’च्या घरातून एक खळबळजनक बातमी आली. भाईजानच्या या क्लासनंतर जुबैर टेन्शनमध्ये आला आणि त्याने म्हणे खूप साºया गोळ्या खाल्लया. यानंतर जुबैरला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आले.

ALSO READ : Bigg Boss 11: Day1: हसिना पारकरच्या जावयाची पहिल्याच दिवशी दादागिरी,म्हणाला मीच आहे TRP

सेटवरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या कठोर शब्दांमुळे जुबैरने हे पाऊल उचलले. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. काल शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान प्रचंड रागात दिसला. या संतापाचे कारण अर्थातच जुबैर होता. ‘बिग बॉस’च्या घरात जुबैरचे अर्शी खानसोबत मोठे भांडण झाले होते. अर्शीबद्दल जुबैर बरेच आक्षेपार्ह बोलला होता. ‘दो कौडी की औरत’ असे काय काय तो बोलला होता. जुबैर खान स्वत:ला दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा जावई आणि ‘हसीना’ या चित्रपटाचा प्रोड्यूसर असल्याचे सांगतो. पण सत्य काही वेगळेच आहे. ‘मिड डे’च्या वृत्तानुसार, ‘हसीना’चे को-प्रोड्यूसर आणि दाऊदच्या कुटुंबातील सदस्य समीर आंतुनेने जुबैरला खोटे ठरवले आहे. आमच्या कुटुंबाचे जुबैरसोबत काहीही कनेक्शन नाही. तो स्वत:च्या पब्लिसिटीसाठी दाऊदचे टायटल वापरतो आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
'बिग बॉस' चा 11वा सिझन सुरू झाला आहे. त्यात बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासूनच घरात स्पर्धकांनी एकमेकांना आपला रंग दाखवायला सुरूवात केली आहे.  हा त्यातलाच एक रंग म्हणायला हवा.
Web Title: After the threat of Salman Khan, Jubair Khan shot in the house of Bigg Boss, admitted to the hospital!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.