After 'Mouni Roy', 'This' is a small screen actress doing Bollywood entry | मौनी रॉय नंतर 'ही' छोट्या पडद्यावरील अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये एंट्री

टीव्ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करतायेत. मौनी रॉय, दीपिका कक्कड आणि मृणाल ठाकूरनंतर आणखीन एक अभिनेत्री सिल्वर स्क्रिनवर पदार्पण करते आहे. तिचे नाव आहे कृतिका कामरा.  कृतिका एका तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा नवा चित्रपट ‘पेल्ली चूपुलु’या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. या तेलगू चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रितु वर्मा हे लीड रोलमध्ये होते. राष्ट्रीय पुरस्कार नावावर असलेल्या या चित्रपटाचाच हिंदी रिमेक बनतोय आणि कृतिका व जॅकी त्यात लीड रोलमध्ये दिसणार आहेत. ‘फिल्मीस्तान’चा दिग्दर्शक नितीन कक्कर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. कृतिकाच्या बर्थडेला जॅकीने सरप्राईज पार्टी दिली होती. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच चर्चांनी जोर धरला. पहिल्यांदा कृतिकाने अफेअरबाबत होणाऱ्या चर्चांवर आपली बाजू मांडली आहे. बॉलिवूड लाईफशी बोलताना कृतिका म्हणाली, जॅकी हा माझा फक्त को-स्टार आहे. आम्ही नुकतेच आमच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कृतिका याआधी एकता कपूरच्या बदतमीज दिल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. ज्यात तिच्यासह करिना कपूर हि दिसणार होती. मात्र काही कारणामुळे या चित्रपटाचे काम पुढे सरकू शकले नाही. 

कृतिका कामरा टेलिव्हिजनवरील मालिका ‘कितनी मोहब्बत है’ यातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. या मालिकेतील कृतिकाने साकारलेली आरोही आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’मधील डॉ. निधी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. कृतिका सध्या प्रेम या पहेली- चंद्रकांता' या मालिकेत दिसते आहे. कृतिका आणि करण कुंद्रा बºयाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.कृतिका कामरा आणि करण कुंद्रा २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत है’मध्ये एकत्र बघावयास मिळाले होते. यानंतर हे दोघेही एका ‘नच बलिए’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळाले. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. 
  
Web Title: After 'Mouni Roy', 'This' is a small screen actress doing Bollywood entry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.