After the big fight, Revati and Subodh stuck in a wedding, both of them were married | मोठ्या संघर्षानंतर रेवती आणि सुबोध अडकले लग्नबंधनात,लग्नात दोघांचा असा होता अंदाज

'माझ्या नव-याची बायको' मालिकेनं आता रंजक वळण घेतलंय.कारण रेवती आणि सुबोध दोघांनीही त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली आहे. राधिकाची बेस्ट फ्रेंड अर्थातच रेवतीने अखेर सुबोधसह लग्नाच्या बेडीत अकडली आहे.सुबोध आणि रेवतीच्या हळदीच्या कार्यक्रमानंतर आता लग्नविधी पाहायला मिळणार आहेत.वर-वधूच्या रुपात रेवती आणि सुबोध अतिशय सुंदर दिसले.यावेळी रेवतीने लग्नात पिवळ्या नऊवारी परिधान केली होती.तर सुबोधनेही निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ऑनस्क्रीन रंगणा-या विवाहसोहळ्यासाठी सारेच खूप उत्सुक होते. या मालिकेत रेवतीचं लग्न मोडलं असून लेकीचा सांभाळ करते. गुरु आणि शनायाच्या अफेअरचा सगळ्यात आधी संशय हा रेवतीलाच येतो.रेवतीची मदत घेऊन राधिकाने शनाय आणि गुरुनाथला धडा शिकवला आहे.रेवतीची हीच भूमिका अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने साकारली आहे.श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे. या गोजिरवाण्या घरात या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते. या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर श्वेता आणि राहुल यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि श्वेता यांच्या जीवनात आर्य नावाचा त्यांचा मुलगाही आहे. माझ्या नव-याची बायको या मालिकेत गंभीर आणि पुरुषांवर तिरस्कार करणा-या महिलेची भूमिका श्वेता साकारत असली तरी रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.दिवसेंदिवस ‘माझ्या नव-याची बायको’मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे शनाया या व्यक्तीरेखेचा. अभिनेत्री रसिका सुनील हिनं ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली आहे. मौजमजा आणि धम्माल जीवन जगण्यासाठी गॅरी म्हणजेच गुरुनाथला आपल्याकडे आकर्षित करणारी शनाया ही भूमिका रसिकानं मोठ्या खुबीनं रंगवली आहे.फक्त पैस्यांच्या लोभापोटी शनाया गुरूनाथ (अभिजीत खांडेकर)ला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत असते. तसेच गॅरीही पत्नी राधिकाला ( अनिता दाते) सोडून शनायाच्या मागे असतो.मात्र या तिघांमध्ये आता आणखीन एका व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे.'माझ्या नवऱ्याची बायको'चे कन्नड व्हर्जन मालिकेत 'गॅरी' ही भूमिका गुरुमुर्ती भवानी सिंग हा अभिनेता साकारत आहे.खरंतर गुरुमुर्तीच्या एंट्रीने मालिकेला आता अधिक रंजक वळण मिळाल्याचे पाहायला मिळणार आहे.कारण गुरूमुर्तीची एंट्री होताच  गॅरीवर लट्टु झालेली शनाया गुरूमुर्तीला पाहताच त्याच्यावर  फिदा झाल्याचे पाहायला मिळणार आहे.त्यामुळे आगामी काळात शनायाच्या आयुष्यात गुरूनाथचा पत्ता कट होणार आणि गुरूमुर्ती शनायाच्या आयुष्यात एंट्री करणार असा ट्रॅक लवकरच मालिकेत पाहायला मिळणार असल्याचे समजतंय.
Web Title: After the big fight, Revati and Subodh stuck in a wedding, both of them were married
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.