After 13 years; Users said, 'Killeesh and Doctor Junkel will no longer forgive' | १३ वर्षांनंतर परतला शक्तिमान; यूजर्सनी म्हटले, ‘किलविश अन् डॉक्टर जॅकाल आता माफ करणार नाहीत’

आजच्या युगात टीव्हीची क्रेझ पूर्वीसारखी राहिली नाही असे म्हटले तर ते घाईचे ठरू नये. कारण एक काळ असा होता की, ‘रामायण, महाभारत, चित्रहार’ यांसारखे कार्यक्रम बघण्यासाठी आपण आठवडाभर प्रतीक्षा करायचो. त्यातच ९० च्या दशकात आलेल्या ‘शक्तिमान’ या मालिकेने लहान मुलांसह मोठ्यांमध्ये कमालीची लोकप्रियता मिळविली होती. १९९७ ला सुरू झालेली ही मालिका २००५ मध्ये संपली. मालिकेत अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ची भूमिका साकारली होती. सुपरहिरो कसा असावा हे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून दाखवून दिले होते. आता तुम्ही विचार करीत असाल की, ही मालिका बंद होऊन आज १३ वर्षे होत आहेत, अशात याबाबतची माहिती सांगण्याचे काय कारण? तर आज आम्ही ‘शक्तिमान’विषयी एक नवी बातमी घेऊन आलो आहे. होय, यू-ट्यूबवर ‘शक्तिमान’च्या प्रसिद्ध टायटल सॉन्गचे नवे व्हर्जन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. हे टायटल साँग ऐकून तुमच्याही आठवणी ताज्या होतील यात शंका नाही. 

मातृभूमी कप्पा टीव्ही या यू-ट्यूब चॅनेलवर ‘शक्तिमान १००० सीसी’ नावाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘शक्तिमान’चे टायटल ट्रॅक अतिशय हटके अंदाजात बघावयास व ऐकावयास मिळत आहे. आतापर्यंत हे नवे टायटल साँग ११ हजारांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. विशेष म्हणजे त्यास यूजर्सकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ बघितल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे म्हटले तर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. एका यूजर्सनी लिहिले की, तुम्ही जर असे व्हिडीओ प्रदर्शित केले तर किलविश आणि डॉक्टर जॅकाल तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. दरम्यान, ‘शक्तिमान’ ही मालिका त्याकाळी प्रचंड प्रसिद्धीझोतात आली होती. मुकेश खन्ना यांनी सुपरहिरोची भूमिका खूपच उत्कृष्टपणे साकारली होती. 
Web Title: After 13 years; Users said, 'Killeesh and Doctor Junkel will no longer forgive'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.