This advice was given by Bhajan Samiti Anup Jalota and Alka Yagnik to the contestants of 'Om Shanti Om' in the semi-final. | ‘ओम शांती ओम’च्या उपान्त्य फेरीतील स्पर्धकांना भजनसम्राट अनूप जलोटा आणि अलका याज्ञिक यांनी दिला हा सल्ला!

'ओम शांती ओम' हा भक्तिसंगीतावरील देशातील पहिला रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आता त्याच्या अंतिम फेरीकडे चालला आहे. उपान्त्य फेरीतील चार स्पर्धक या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी एकमेकांशी अटीतटीची स्पर्धा करीत असून उपान्त्य फेरीत त्यांची कामगिरी पूर्वीपेक्षा जबरदस्त असेल, अशी अपेक्षा आहे.ही फेरी धमाकेदार करण्यासाठी भजनसम्राट अनूप जलोटा आणि नामवंत पार्श्वगायिका अलका याज्ञिक हे उपान्त्य फेरीत विशेष अतिथी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी अलका याज्ञिक आपल्या सुरेल आवाजात गोकुल का ग्वाला हे भजन गाणार असून अनूप जलोटा आपली एकेकाळची विद्यार्थिनी व सध्या कार्यक्रमातील एक परीक्षक कनिका कपूर हिच्याबरोबर भजन सादर करतील.‘ओम शांती ओम’मधील या विशेष उपस्थितीबद्दल अलका याज्ञिकने सांगितले, “या कार्यक्रमाच्या संकल्पनेचं मला फारच आकर्षण वाटलं. ‘ओम शांती ओम’सारख्या भक्तिसंगीतावरील एखाद्या कार्यक्रमाची नक्कीच गरज होती आणि मला त्यात थोडा काळ तरी सहभागी होता येत असल्याचा खूप आनंद होत आहे. आतापर्यंत मी बर्‍याच संगीताच्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम केलेलं असलं, तरी ‘ओम शांती ओम’सारख्या भक्तिसंगीतावरील एखाद्या कार्यक्रमाच्या या पवित्र व्यासपिठावर मी प्रथमच येणार आहे.”भजनसम्राट अनूप जलोटा म्हणाले, “भक्तिसंगीताची परंपरा आजची तरूण पिढी पुढे नेत असल्याचं पाहून मला खूपच मानसिक समाधान वाटतं. या कार्यक्रमातील सर्वच स्पर्धक फारच गुणवान असून मला त्यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकता आलं,याबद्दल मी समाधानी आहे. सेटवरचं वातावरण गंभीर आणि शांत होतं.”“भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना भक्ती संगीतावर आधारित एक रिअॅलिटी शो पाहायला मिळत आहे.  या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मला सूत्रधार म्हणून सहभागी होता आले, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो तसेच  सर्व स्पर्धकही खूप मेहनत घेत असल्याचे या शोचा होस्ट अपारशक्ती खुराणाने सांगितले.
Web Title: This advice was given by Bhajan Samiti Anup Jalota and Alka Yagnik to the contestants of 'Om Shanti Om' in the semi-final.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.