Adhunay Mehta appears in this role in 'Kulfikumar Bajwa' | ​‘कुल्फीकुमार बाजावाला’मध्ये या भूमिकेत दिसणार अपरा मेहता

‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’ या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत सविता ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अपरा मेहताने साकारली होती. अपराच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.  
अपरा ही गुजराती रंगभूमीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच आजवर एक महल हो सपनो का, सजन रे झूठ मत बोलो, फिरंगी बहू, जमाई राजा यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील एक नामवंत अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेसाठी तर अपराला अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. तिने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. चोरी चोरी चुपके चुपके, देवदास, तीस मार खान यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अपरा आता पुन्हा एकदा एका मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिने ही नवी मालिका नुकतीच साइन केली आहे.
निर्माती गुल खानची ‘कुल्फीकुमार बाजावाला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असूून या मालिकेतील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी अपराला करारबद्ध करण्यात आले आहे. या मालिकेत ती नायकाच्या आईची भूमिका साकारणार आहे. एक तरूण मुलगी आपल्या कुटुंबाला परिपूर्ण बनवण्यासाठी आपल्या बेपत्ता वडिलांचा शोध घेते, अशी या मालिकेची संकल्पना आहे. ही एक नकारात्मक भूमिका असून अपराची भूमिका प्रेक्षकांना प्रंचड आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे. अपरा या मालिकेच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार आहे.
‘कुल्फीकुमार बाजावाला’ ही मालिका या मालिकेची संकल्पना ही आजकालच्या मालिकांपेक्षा वेगळी असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही मालिका लवकरच स्टार प्लस या वाहिनीवर सुरू होणार आहे. 

Also Read : नया महिसागरचा तिसरा सिझन?
Web Title: Adhunay Mehta appears in this role in 'Kulfikumar Bajwa'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.