Actress's sister in the 'Bidayai' series will be as bold and hot as soon as she is on a small screen. | ‘बिदाई’ मालिकेतील अभिनेत्रीची बहिण तिच्या इतकीच बोल्ड आणि हॉट,लवकरच छोट्या पडद्यावर घालणार धुमाकूळ

छोट्या पडद्यावर सपना 'बाबुल का बिदाई' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.या मालिकेत अभिनेत्री सारा खान हिने सा-यांची मनं जिंकली होती. साराच्या अभिनयासह तिच्या अदाही रसिकांना भावल्या होत्या. आता साराप्रमाणेच तिची बहिण छोट्या पडद्यावरील रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. साराची बहिण आर्या लवकरच डेली सोप क्वीन एकता कपूरच्या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारणार आहे.एकता कपूर लवकरच कसौटी जिंदगी की २ रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या मालिकेतून आर्या आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार आहे.लवकरच ती मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या मालिकेत आर्या ही प्रमुख भूमिका साकारणा-या अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे.मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणा-या अभिनेत्याच्या भावासह आर्याची जोडी दाखवण्यात येणार आहे. मोठी बहिण साराप्रमाणेच आर्यासुद्धा हॉट, बोल्ड आणि तितकीच सेक्सी आहे.काही महिन्यांपूर्वी आर्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती.त्यावेळी केलेल्या धम्माल मस्तीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यांत तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. सप्टेंबर महिन्यात 'कसौटी जिंदगी की- २' हा शो रसिकांच्या भेटीला येईल.सात वर्षांनंतर एकता कपूर हा शो नव्या स्टारकास्टसह पुन्हा एकदा रसिकांसाठी घेऊन येत आहे. 


cnxoldfiles/a>सध्या ती टांजानियामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. येथे हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही हॉट  फोटोज साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.फोटोजमध्ये सारा समुद्रात बोटीवर मस्ती करताना दिसत आहे.साराचा हा अंदाज भलताच हॉट आणि तितकाच सेक्सी असून ऑरेंज कलरचा बॅकलेस टॉप आणि हॉट पँटमध्ये सारा खूप ग्लॅमरस दिसत आहे.तिने शेअर केलेल्या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.
Web Title: Actress's sister in the 'Bidayai' series will be as bold and hot as soon as she is on a small screen.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.