Actress, 'Wonder Woman' | 'या' ठिकणी व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री,दिसला ग्लॅमरस लूक

सेलिब्रेटीही सध्या व्हॅकेशन एन्जॉय करण्याचे मुडमध्ये दिसतायेत.'ससुराल सिमर का' मालिकेत झळकलेली ज्योत्सना चंडोलाही मलेशिया,थायलँड आणि इंडोनेशियामध्ये व्हॅकेशन इन्जॉय करतेय.ज्योत्सना पती नीतेशसह व्हॅकेशन एन्जॉय करताना फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.आता इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी निसर्गाच्या सान्निध्यात तर कधी हॉटेलवर निवांत क्षण घालवत विश्रांती घेत असल्याचेही पाहायला मिळत आहे.ज्योत्सनाच्या  लग्नाला 3 वर्षे पुर्ण झाली आहेत.दोघांनी 2015 मध्ये लग्न केले होते.ससुराल सिमर का मालिकेसोबतच ज्योत्सनाने अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. तिने 'भागोंवाली -बांटे अपनी तकदीर', 'मिसेस की कौशिश की पांच बहुएं', 'सावधान इंडिया', 'क्राइम पेट्रोल', 'संतोषी मां' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.मात्र ती जास्त प्रकाशझोतात आली ती 'ससुराल सिमर का'मालिकेतून.'संस्कारी बहू'च्या भूमिकेत ज्योत्स्ना चांदोला झळकली होती.मालिकेत तिची भूमिका थोडी नेगिटीव्ह असली तरीही रसिकांनी ज्योत्स्नाने साकारलेली ती भूमिका चांगली पसंती दिली होती. तसेच ज्योत्स्ना तिच्या हॉट फोटोमुळेही चर्चेत होती. याआधी कधीच तिने अशाप्रकारचे फोटोशूट केले नव्हते.त्यावेळी संस्कारी बहुची इमेज ब्रेक करण्यासाठी तिने हे खास फोटोशूट करून घेतले असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.या फोटोत ती बिकनी अवतारात दिसली होती.याच अभिनेत्रीप्रमाणे आणखी एक अभिनेत्री व्हॅकेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे.'गोपी बहु' म्हणून घराघरांत पोहचलेली देवोलीना भट्टाचार्जी सध्या अंदमान निकोबार मध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसते.कधी ती तिचे हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते तर कधी व्हॅकेशन एन्जॉय करताना चर्चेत येते. सध्या ती कामाच्या शोधात असून तिला नवीन काम मिळत नसल्याचे माहिची मिळते.नवीन काम मिळत नसल्यामुळे ती सध्या फोटोशूट तर कधी इकडे तिकडे फिरण्यात आपला वेळ घालवताना दिसते.'साथ निभाना साथिया' मालिकेमुळेच देवोलिना प्रकाश झोतात आली होती हा शो 2017 मध्ये बंद झाला.यानंतर तिला दूसरा कोणताही प्रोजेक्ट मिळाला नाही.ती नवीन शो करण्यासाठी तयार आहे. परंतू तिला हवी तशी भूमिकाच सध्या तिला ऑफर होत नसल्यामुळे ती चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे.

Web Title: Actress, 'Wonder Woman'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.