Actress Veena Jagtap's 'she' wish was fulfilled? Read detailed | अभिनेत्री वीणा जगतापची 'ती'इच्छा झाली पूर्ण?वाचा सविस्तर

'राधा प्रेम रंगी रंगली' या नव्या मालिकेमुळे मालिकेतील राधा ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच वीणा जगताप सध्या खूपच उत्सुक आणि आनंदी आहे. याला कारणही तसे खासच आहे तिची ही मुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका असून तिने प्रेक्षकांबरोबर तिचे काही अनुभव शेअर केले आहेत.पहिलीच मालिका ती पण कविता लाड (मेढेकर), सचित पाटील, शैलेश दातार यांसारख्या कलाकरांबरोबर करायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. या सगळ्यांनी मला काही दिवसातच स्वीकारले याचा मला खूप आनंद आहे.खूप काही गोष्टी या सगळ्यांकडून मला शिकायला मिळत आहेत.पहिल्याच मालिकेमध्ये मला राजेश मापुसकर यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली.याच दरम्यान त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीदेखील शिकता आल्या. त्यांनी आमच्या मालिकेचे शीर्षक गीत अप्रतिमरीत्या दिग्दर्शित केले आहे.त्यांच्याकडून शिकता आलेली पहिली आणि महत्वाची बाब म्हणजे “ कोणतेही काम करताना त्या कामात फुल ऑन झोकुन देणे ” आणि दुसरी म्हणजे “अशक्य असे काहीच नाही.अभिनय क्ष्रेत्र असो वा दुसरे कुठलेही या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात असं मला वाटतं. आम्ही सेटवर खूप धम्माल मस्ती करतो, याचबरोबर मला सहकलाकारांकडून खूप गोष्टी शिकायला देखील  मिळत आहेत. खासकरून कविता लाड, सचित आणि ऋग्वेदी प्रधान यांच्याकडून. मी आणि आमच्या संपूर्ण टीमने या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि आता ही मालिका  रसिकांच्याभेटीला येत आहे, फायनली ही गोष्ट घडली याचा मला खूप खूप आनंद आहे.
 
आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी प्रेमात पडावं असं वाटतंच. प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. काहींना त्यांचं प्रेम पहिल्या भेटीतचं गवसतं तर काहींना हुलकावणी देतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे पण ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱ्यासाठी लग्न म्हणजे संसार ! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ? युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची कथा, “राधा प्रेम रंगी रंगली” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मालिकेत अभिनेत्री कविता लाड मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपाराजीत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
Web Title: Actress Veena Jagtap's 'she' wish was fulfilled? Read detailed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.