Actress Sheetal Thakkar will enter the series! | अभिनेत्री शीतल ठक्कर करणार या मालिकेत एंट्री!


'साराभाई व्हर्सेस साराभाई','करिना करीना' तसेच अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली शीतल ठक्कर ही अभिनेत्रीने 'बाझीगर' आणि 'सतरंगी ससुराल' या मालिकांमध्येही भूमिका रंगवल्या होत्या.लवकरच ती ‘जीजी माँ’ मालिकेतही प्रवेश करणार आहे. यात ती उत्तरादेवी यांची प्रतिस्पर्धी मैथिली सेनगुप्ता या महिला उद्योजिकेची भूमिका साकारणार आहे.उत्तरादेवी ही हुकुमशाही प्रवृत्तीची असते, तर मैथिली ही लोकशाही मानणारी असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ती सर्व कर्मचा-यांचे मत काय आहे, ते जाणून घेते. तिच्या या स्वभावामुळे सर्व कर्मचारी तिच्यावर खुश असतात. मैथिली ही  बॉसची भूमिका साकारणार आहे. आपला बॉस असा असावा, असे प्रत्येक कर्मचा-याला वाटत असते. अलीकडेच मुलाला जन्म दिल्यामुळे शीतलने अभिनयापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.परंतु आता ती छोट्या पडद्यावर परतली असून तिने आपला लूकही चेंज केला आहे.शीतलने सांगितले, “मला मैथिलीची भूमिका ही टीव्हीवरील अन्य दैनंदिन मालिकांतील भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचं जाणवलं. ती एक यशस्वी उद्योजिका असली, तरी ती हुकुमशाही वृत्तीची नसते. ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, मनमिळाऊ स्वभावाची असते आणि हा स्वभाव उत्तरादेवीच्या अगदीच विरोधी आहे.आम्ही यात माझं रूप कसं असेल,त्यावर बराच विचार केला आणि विविध रूपं तयार करून पाहिली.असं सहसा घडत नाही. ‘जीजी माँ’बद्दल माझा अनुभव अगदी छान असून मी जी भूमिका साकारीत आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे.”

cnxoldfiles/a>मालिकेत पल्लवी खलनायिकेची भूमिका पहिल्यांदाच रंगवत आहे.तिची ही भूमिका पाहिल्यानंतर अनेक महिला तिचा तिरस्कार केल्याशिवया राहणार नाहीत.मालिकेतील उत्तरादेवीच्या भूमिकेत शिरल्यावर पल्लवीला ओळखणे अवघड बनते. तिचे रूप ठसठशीत करण्यासाठी खास तिच्यासाठी  दागिने तयार करण्यात आले होते.बिंदी, सिंदूर आणि कपड्यांमुळे तिचे रूप  बदलून जाते.तिच्या भल्या मोठ्या बिंदीचा रंग तिच्या सिंदुराशी रंगसंगती साधतो.बिंदी आणि सिंदूर यांच्या या रंगसंगतीमुळे नवा फॅशन ट्रेंड निर्माण होईल, यात शंकाच नाही. याशिवाय ती मोठ्या आकाराची कानातील कुंडले घालताना दिसते. ही कुंडले म्हणजे जणू काही ईअरफोन्सच असल्यासारखे वाटतात.तिच्या कपड्यांबद्दल बोलायचे झाल्यास वेशभूषाकारांनी तिची साडी ही लेहेंग्यासारखी बनविली आहे.ते पाहून असा लेहेंगा आपल्या वॉर्डरोबमध्ये असावा,अशी इच्छा प्रत्येक स्त्रीला होईल.
Web Title: Actress Sheetal Thakkar will enter the series!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.