Actress Jennifer Wingate, who was seen in her childhood | लहानपणी अशी दिसायची अभिनेत्री जेनिफर विंगेट

'लहानपण देगा देवा' म्हणत टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने तिचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर अपडेट केला आहे.शेअर केलेल्या फोटोत जेनिफर मैत्रिणींसह एका कार्यक्रमात एन्जॉय करताना दिसतेय.या फोटोत जेनिफर खुप क्युट दिसत असून ती लहानपणापासून फन लव्हींग असल्याचे फोटोकडे पाहिल्यावर तुम्हालाही जाणवेल. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच तिच्या फोटोला खूप सा-या कमेंट आणि लाईक्स मिळतायेत. जेनिफरला लहानपणापासून अभिनयाचे वेड होते.तिच्या शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये जेनिफर आवडीने भाग घेत. अभिनयाची आवड पुढे तिची करिअर बनले.त्यानुसार तिने वेगळ्या मालिकांमध्ये विविधारंगी भूमिका साकारल्याला आहेत.सध्या जेनिफर बेहद ही मालिकेत माया नावाची भूमिका साकारतेय.विशेष म्हणजे जेनिफर ही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सगळ्या जास्त फीस घेणारी अभिनेत्री ठरली आहे. 'बेहद' या मालिकेसाठी तिला पूर्वी एका एपिसोडचे 80 हजार रू.इतके मानधान मिळायेच आता ती 1 लाख रू.इतकी मानधन तिला मिळते. तसेच जेनिफर सध्या तिच्या मॅरिटल लाईफमुळेही खूप चर्चेत आहे. कारण जेनिफरने करणसिंग ग्रोवरसह लग्न केले होते. मात्र काही कारणामुळे त्यांचे बिनसले आणि दोघांनी काडीमोड घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसह लग्नकरत आपला वेगळा संसार थाटला. करणसिंगचे बिपाशा बासुसह असलेले लव्ह अफेअरमुळे जेनिफरने करणसिंगला घटस्फोट दिला असल्याचे बोलले जाते.त्यामुळे जेनिफर आणि करण यांच्या नात्यात बिपाशा बासुने फुट पाडल्याचे बोलले जाते.जेनिफर भूमिका साकारत असलेली बेहद या मालिकेतील भूमिकेलाही रसिकांची चांगली पसंती मिळत असल्यामुळे 'बेहद' ही लोकप्रिय मालिका ठरत आहे. 


Web Title: Actress Jennifer Wingate, who was seen in her childhood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.