The actress has filed a complaint against the producer without giving any money. | पैसे न दिल्याने ‘या’ अभिनेत्रीने निर्मात्यावरच दाखल केला गुन्हा!

कलर्स टीव्हीवरील ‘मधुबाला - एक इश्क एक जुनून’ या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री दृष्टी धामी सध्या चर्चेत आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी दृष्टीला तिची फिस दिली नसल्याचा तिने आरोप केला असून, संबंधितांवर तिने चक्क गुन्हा दाखल केला आहे. मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दृष्टीने ‘मधुबाला’ नावाचे पात्र साकारले. याबद्दल दृष्टीने सांगितले की, मालिकेचे निर्माता अभिनव शुक्ला यांनी अद्यापपर्यंत मला माझे संपूर्ण मानधन दिले नाही. वास्तविक असे पहिल्यांदाच घडले नसून, यापूर्वीदेखील बºयाचशा अभिनेत्रींनी निर्मात्यांवर अशाप्रकारचे आरोप केले आहेत. ‘मेरी आवाज ही मेरी पहचान’ या मालिकेत भूमिका साकारणाºया अमृता रावनेदेखील निर्मात्यांनी पूर्ण पैसे दिले नसल्याचा आरोप केला होता. 

स्पॉटबॉयच्या एका रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी मालिकेची फिस म्हणून दृष्टीला अद्यापपर्यंत ३६ लाख रुपये दिले नाहीत. २०१२ ते २०१४ दरम्यान प्रसारित झालेली ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली होती. दृष्टी धामीने सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनमध्ये संबंधित निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिपोर्टनुसार, अभिनव शुक्लाने याप्रकरणी सांगितले की, पुढील मालिकांच्या कमाईमधून दृष्टीला पैसे देणार आहेत. अभिनव शुक्ला यांना याअगोदरही अशाप्रकारच्या प्रकरणांमुळे टीव्ही सर्कलमध्ये बॅन करण्यात आले आहे. मात्र यावेळेस हे प्रकरण सिंटापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे दृष्टीला लवकरात लवकर पैसे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नुकतीच दृष्टी धामी मित्र नकुल मेहतासोबत ‘ए टेबल फॉर टू’ या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. शोच्या एका रॅपिड फायर राउंडमध्ये दृष्टीला विचारले होते की, इंडस्ट्रीतील अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्यासोबत तुला परत काम करायचे नाही? यावेळी दृष्टीने मधुबाला शोचा को-अ‍ॅक्टर विवियान डिसूझा याचे नाव घेतले होते. दृष्टीने ‘परदेस में है मेरा दिल, एक था राजा एक थी रानी, गीत, दिल मिल गए आणि सजन रे झूठ मत बोलो’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. 
Web Title: The actress has filed a complaint against the producer without giving any money.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.