Actor will replace 'Gary' in 'Shaniya'? | ‘शनाया’च्या आयुष्यातील ‘गॅरी’ची जागा घेणार हा अभिनेता?

दिवसेंदिवस ‘माझ्या नव-याची बायको’मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे शनाया या व्यक्तीरेखेचा. अभिनेत्री रसिका सुनील हिनं ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली आहे. मौजमजा आणि धम्माल जीवन जगण्यासाठी गॅरी म्हणजेच गुरुनाथला आपल्याकडे आकर्षित करणारी शनाया ही भूमिका रसिकानं मोठ्या खुबीनं रंगवली आहे.फक्त पैस्यांच्या लोभापोटी शनाया गुरूनाथ (अभिजीत खांडेकर)ला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत असते. तसेच गॅरीही पत्नी राधिकाला ( अनिता दाते) सोडून शनायाच्या मागे असतो.मात्र या तिघांमध्ये आता आणखीन एका व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे.'माझ्या नवऱ्याची बायको'चे कन्नड व्हर्जन मालिकेत 'गॅरी' ही भूमिका गुरुमुर्ती भवानी सिंग हा अभिनेता साकारत आहे.खरंतर गुरुमुर्तीच्या एंट्रीने मालिकेला आता अधिक रंजक वळण मिळाल्याचे पाहायला मिळणार आहे.कारण गुरूमुर्तीची एंट्री होताच  गॅरीवर लट्टु झालेली शनाया गुरूमुर्तीला पाहताच त्याच्यावर  फिदा झाल्याचे पाहायला मिळणार आहे.त्यामुळे आगामी काळात शनायाच्या आयुष्यात गुरूनाथचा पत्ता कट होणार आणि गुरूमुर्ती शनायाच्या आयुष्यात एंट्री करणार असा ट्रॅक लवकरच मालिकेत पाहायला मिळणार असल्याचे समजतंय.‘माझ्या नव-याची बायको’ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजते आहे.मराठीप्रमाणेच कन्नड व्हर्जन असलेली 'सुब्बुलक्ष्मी सम्सारा' या मालिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळत आहे.मालिकेत शनायाच्या भूमिका साकारणारी रसिका ऑनस्क्रीनही वेस्टर्न आऊटफिटमध्ये पाहायला मिळतेय.मात्र तुम्हाला माहिती आहे का मालिकेत झळकण्यापूर्वी रसिकांने पोस्टर गर्ल या मराठी सिनेमात झळकली होती.कशाला लावतो नाट या गाण्यावर तिने अस्सल मराठमोळ्या अंदाजात लावणी करताना ती थिरकली होती. पोस्टर गर्ल सिनेमातले हे गाणे हे खूप लोकप्रिय ठरले.आणि याच गाण्यामुळे तिच्या करिअरला नवीन वळण मिळाले. पोस्टर गर्ल गाण्यात लावणीवर थिरकलेली रसिकाला पाहताच सारेच आश्चर्यचकीत होतात.मालिकेत धड  मराठीही न  बोलणारी शनाया सिनेमात मात्र लावणी करताना दिसते तेव्हा सा-यांनाच एक सुखद धक्का बसतो. लावणी करतानाचा तिचा हा लूकचीही चांगलीच भुरळ पडल्याचे पाहायला मिळते.
Web Title: Actor will replace 'Gary' in 'Shaniya'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.