Actor in the third season of 'India's Best Dramaabaz' will be seen as an examiner? | ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सिझनमध्ये परिक्षक म्हणून झळकणार हा अभिनेता?

‘झी टीव्ही’वरील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअॅलिटी कार्यक्रमाचा तिसरा सिझन लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या सिझनने कार्तिकेय राज, तमन्ना दीपक,कार्तिकेय मालवीय आणि प्रणीत यासारखे गुणवान बालकलाकारांनी आपल्या कौशल्याने सा-यांचे मनोरंजन केले.आज या कार्यक्रमामुळे या बालकलाकारांनी मनोरंजन क्षेत्रात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीत भारताचे भावी सुपरस्टार बनविण्याच्या दृष्टीने लहान मुलांमधील कसदार अभिनयगुणांचा शोध घेतला जाणार आहे.

या कार्यक्रमात आता एका परीक्षकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच चित्रपट निर्माता आणि नेपथ्यकार उमंग कुमार दिसणार असून तो अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्याबरोबर दिग्गज परीक्षकांच्या पॅनलवर असेल.तो या स्पर्धकांना अभिनयगुणांच्या विकासात मदत करणार आहे.या क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा लाभ या स्पर्धकांना देताना या स्पर्धकांकडून प्रेक्षणीय अभिनय सादर व्हावा यासाठी तो त्यांना बारकाईने मार्गदर्शन करणार आहे.उमंगकुमार म्हणाला, “सुमारे 25 वर्षांपूर्वी ‘झी टीव्ही’वरील ‘एक मिनिट’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन केले होते.या शोपासून माझ्या कारकीर्दीला प्रारंभ केला  केला होता.‘झी टीव्ही’ या वाहिनीला मी  दुसरे कुटुंबच समजतो.'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' शोमुळे माझ्या करिअरच एक वर्तुळ पूर्ण झालं आहे असं मला वाटतं आणि आता ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये आवृत्तीत परीक्षक म्हणून काम करण्याचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे.मी या कार्यक्रमाच्या पूर्वीचे सिझन पाहिले असून ते मला  खूप आवडले होते.आता या शोच्या माध्यमातून मी माझ्या छोट्या बालमित्रांना  त्यांच्या अभिनयगुणांच्या विकासात मदत करणार असून नक्कीच या कार्यक्रमाचा  तिसरा सिझनही इतर सिझनप्रमाणे सुपरहिट ठरणार असा विश्वास उमंगने यावेळी व्यक्त केला आहे.

तसेच सोनाली कुलकर्णीने या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, “मला लहान मुलं फार आवडातात.मुलांमध्ये फारच उत्तम अभिनयगुण असून ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमात त्यांच्या या गुणांना पूर्ण वाव मिळताना पाहून मला खूप आनंद होतो.त्यांचा उत्साह काही औरच असतो आणि आपल्या कामाबद्दल त्यांची समर्पित वृत्ती आणि प्रामाणिकपणा पाहून मलाही प्रेरणा मिळते.” तर विवेक ओबरॉयने सांगितले की,देशातील काही अतिशय गुणवान बालकलाकारांना मी त्यांच्या अभिनयगुणांच्या विकासात मदत करणार असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळे या मुलांच्या भवितव्याला आकार देण्यात हा कार्यक्रम मदतीचा हात पुढे करतो असं मला वाटतं. 

Web Title: Actor in the third season of 'India's Best Dramaabaz' will be seen as an examiner?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.