Actor Rekha will be seen as a celebrity examiner in 'Dil Hai Hindustani-2'? | ‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये अभिनेत्री रेखाची सेलिब्रिटी परीक्षक म्हणून झळकणार?

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय,चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा.त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत.त्यामुळेच की काय बॉलिवूड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा संगीतविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रम असून त्यातून केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील संगीत क्षेत्रातील गुणवान कलाकारांचा शोध घेतला जातो.आता अशा गुणवान गायकाच्या शोधासाठी तीन नामवंत परीक्षकांचे एक पॅनल बनविण्यात आले असून त्यात किंग ऑफ पंजाबी रॅपर बादशहा, भारतातील अतिशय नामवंत पार्श्वगायिका सुनिधी चौहान आणि अनेक सुरेल आणि पायाचा ठेका धरायला लावणारे संगीत दिलेले संगीत दिग्दर्शक प्रीतम यांचा समावेश होतो.आता या तिघांच्या जोडीला नामवंत अभिनेत्री रेखा यांचाही सेलिब्रिटी परीक्षक म्हणून समावेश केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “या कार्यक्रमाचा ग्लॅमरसपणा वाढविण्यासाठी रेखासारखी नामवंत अभिनेत्री सेलिब्रिटी परीक्षक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या उत्साहाला रेखाच्या उपस्थितीमुळे नवा थरार मिळेल. तिला या कार्यक्रमात काम करताना पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.”

रेखा यांना संगीताची खूप चांगली समज असून ती संगीताची उपासकही आहे.तिने साकारलेल्या काही सदाबहार चित्रपटांमधील भूमिका अतिशय गाजल्या असून त्यांनी स्वत: काही गाणीही गायली आहेत.आता या कार्यक्रमाद्वारे भारतीय चित्रपट संगीताच्या शौकिनांना एक समान व्यासपीठ उपलब्ध होईल आणि त्यावर ते आपली ‘दिल से देसी’ ही भूमिका दाखवून देऊ शकतील. आता या कार्यक्रमाची दुसरी आवृत्तीही पहिल्या इतकीच गाजावी, यासाठी निर्मात्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.‘दिल है हिंदुस्तानी-2’ची ही दुसरी आवृत्ती प्रेक्षकांसाठी ग्लॅमर आणि मनोरंजनाची पर्वणीच असेल.रेखा यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान मिळवलं आहे ते कुणीच मिळवू शकत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून रेखा यांनी सिनेमात काम केलेले नाही. असं असलं तरी त्याचं कमाईचे साधन काय असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. रेखा यांचे आगामी काळात दोन सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमांशिवाय दक्षिण भारतात त्यांची दोन घरं असून त्याचं भाडेरुपात रेखा यांना उत्पन्न मिळतं.रेखा या राज्यसभा खासदार आहेत. खासदारांना त्यांचं वेतन मिळत असतं. ते वेतन रेखा यांनाही मिळतं.बालपणापासून संघर्ष केला असल्यानं त्यांना बचतीचे महत्त्वही नक्कीच माहिती असेल. आयुष्यभरातील कमाईतून त्यांनी नक्कीच काही ना काही बचत केली असणार.याशिवाय पुरस्कार सोहळे, टीव्ही शो, उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं गलेलठ्ठ मानधन रेखा यांना मिळतं. रेखा या अनेक राज्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.गेल्या वर्षी त्या बिहारच्या ब्रँड अॅम्बेसेडर होत्या.त्याचेही रेखा यांना मानधन मिळतं.त्यामुळंच बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून रेखा यांची गणना होते. 
Web Title: Actor Rekha will be seen as a celebrity examiner in 'Dil Hai Hindustani-2'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.