This actor is the only water to drink in the day of struggle | हा अभिनेता संघर्षाच्या दिवसात प्यायचा केवळ पाणी

​​​के के गोस्वामीने शक्तिमान या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर शू... कोई है, विक्राल और गबराल, गुटर गू, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या. के केची उंची केवळ तीन फूट असल्याने त्याला अनेकवेळा चिडवले जायचे. तसेच लोक त्याला गांभीर्याने घ्यायचे नाही. के केने त्याच्या कारकिर्दीत प्रचंड स्ट्रगल केला आहे. के केचा जन्म बिहारमध्ये झाला. त्याचे शिक्षण देखील तिथेच झाले. चित्रपटात येण्यापूर्वी तो त्याच्या गावात स्टुडिओ चालवत होता. त्यानंतर त्याने भोजपुरी चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये करियर करण्याची त्याची लहानपणापासूनची इच्छा होती. त्यामुळे तो करियरसाठी मुंबईत आला. मुंबईत आल्यावर अभिनयक्षेत्रात काम मिळवण्यासाठी त्याला प्रचंड स्ट्रगल करावा लागला. मुंबईत आल्यानंतर त्याची सुरुवातीची सात-आठ वर्षं खूपच वाईट गेली असे तो सांगतो. काही दिवस तर के के आठवड्यातील सहा दिवस केवळ पाणी पिऊन राहायचा. केवळ एकच दिवस तो जेवायचा. कारण सातही दिवस तो काही खाऊ शकेल इतके देखील पैसे त्याच्याकडे नसायचे. त्याला पाणी पिऊन पिऊन इतका कंटाळा आला होता की, पाणी पाहून देखील त्याला उलटीसारखे व्हायचे. एक वेळेचे खायला तरी मिळावे यासाठी तो काहीही काम करायला तयार असायचा. काहीही काम मिळत नसल्याने आपण बिहारला परत जावे असा देखील विचार त्याच्या मनात अनेकवेळा येत असे. पण हार न मानता परिस्थितीशी दोन हात करायचे असे त्याने ठरवले होते. 

k k goswami

के के ला अभिनयक्षेत्रात काम करायचे होते. पण या क्षेत्रात त्याचे कोणीच ओळखीचे नसल्याने काम कसे मिळणार हा त्याला नेहमीच प्रश्न पडत असे. अनेक वर्षं प्रयत्न केल्यानंतर त्याला मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. शक्तिमान या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. आज त्याने छोट्या पडद्यावर त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. खास त्याच्यासाठी अनेक वेळा भूमिका लिहिल्या जातात. 
Web Title: This actor is the only water to drink in the day of struggle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.