बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल याची शाश्वती नसते. त्यामुळेच बिग बॉसचा प्रत्येक सीजन कुठल्या ना कुठल्या कारणांनी वादग्रस्त ठरला आहे. शोच्या सहाव्या सीजनमध्ये तर आशका गोराडिया हिचे प्रकरण चांगलेच गाजले होते. कारण घरातील सना खानसोबतच्या तिच्या मैत्रीचे अनेक अर्थ काढण्यात आले होते. मात्र नंतर आशकाने सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले होते. झी टीव्हीच्या ‘जज्बात... संगीन से नमकीन तक’ या वीकेण्डच्या चॅटशोमध्ये जुही परमारसोबत आशका सहभागी झाली होती. या शोचा होस्ट राजीव खंडेलवालने तिला तिच्या आयुष्यातील अनेक रहस्यांवरील पडदा उघडण्यास सांगितले. बºयाचशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या जुही आणि आशकाने त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा बेधडकपणे खुलासा केला. आशकाने सांगितले की, माझ्या सेक्सुअ‍ॅलिटीला रिअ‍ॅलिटी शोमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये मला एडिटिंग ट्रिक्सच्या माध्यमातून लेस्बियन असल्याचे दाखविण्यात आले होते. यामुळे माझ्या आई-वडिलांना खूपच वाईट वाटले होते. मी शोमध्ये अन्य एक स्पर्धकाच्या शरीरावर बाम लावत होती. कारण तिला अ‍ॅलर्जी झाली होती. आम्ही नॅशनल टीव्हीवर होतो त्यामुळे मीदेखील काही गोष्टींची काळजी घेतली होती. त्यावेळी माझे दोन्ही हात चादरीच्या आत होते. मात्र शोच्या निर्मात्यांनी त्यास अशापद्धतीने दाखविले जणूकाही आमच्यात भलतेच काही तरी सुरू आहे. त्यावेळी मी घरात होती आणि शोच्या फॉर्मेटमुळे स्वत:ची बाजू मांडू शकत नव्हती. जेव्हा माझी आई माझ्याजवळ आली तेव्हा तिने मला सांगितले की, शोमध्ये तुला चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे. लोक तुझ्या सेक्शुअ‍ॅलिटीवर संशय घेत आहेत. तेव्हा मला ही बाब लक्षात आली. 

पुढे शोचा होस्ट, माझे मित्र आणि संपूर्ण मीडिया माझी बाजू मांडण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी लोकांच्या मनात माझ्याबद्दल झालेला संशय दूर करण्यासाठी माझी मदत केली. त्यामुळे मला आता एकच सांगावेसे वाटते की, मी एका पुरुषाबरोबर लग्न केले असून, माझ्या आयुष्यात आनंदी आहे. बिग बॉसच्या सीजन ६ मध्ये सना खानसोबत तिची मैत्री चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली होती. 
Web Title: Actor has revealed that the 'Bigg Boss' is stigmatized as a lesbian; Said, 'I married a man, did you?'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.