Actor acted in Bali with wife of real life, SEE PHOTO | शनायावर लट्टु झालेला हा अभिनेता रिअल लाईफ पत्नीसह बालीमध्ये करतोय एन्जॉय,SEE PHOTO

'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील सचिन देशपांडे पियुषा बिद्नुरसह विवाहबंधनात अडकला.गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. लग्नानंतर हे नवविवाहित दाम्पत्य बाली येथे हनीमूनसाठी गेले  आहेत.सचिनने  त्याचे हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.पत्नी पियुषासोबतचे बाली येथील फोटो शेअर करुन सचिनने समर्पक असे कॅप्शन दिले आहे. त्याने म्हटले आहे की,''तुझ्या सोबत असणे ही माझ्यासाठी सर्वांग सुंदर गोष्ट आहे.''शेअर केलेल्या फोटोत पियुषाचाही ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.शेअर केलेल्या फोटोत दोघेही खूप आनंदित असल्याचेही पाहायला मिळत आहे.हेच फोटो त्यांच्या आनंदाला पारावर उरला नसल्याची ग्वाही देत असल्याचे पाहयला मिळत आहे.दोघांची धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय. सचिनने लग्नाची बातमी सोशल मीडियाद्वारे त्याच्या फॅन्सना सांगितली होती.ही गुड न्युज शेअर करताच त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाला.
'माझ्या नव-याची बायको'नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रोमांचक आणि रंजक बनत चालली आहे.घराघरात प्रत्येकाला ही मालिका चांगलीच भावते आहे.सध्या छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात.त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं.मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. तुझ्यात जीव रंगला या मालिकेला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेकडून जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. कारण 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने टीआरपीमध्ये राणादा-अंजलीच्या मालिकेला मागे टाकले आहे.
Web Title: Actor acted in Bali with wife of real life, SEE PHOTO
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.