Abrar Kazi took inspiration from the role of Sanjay Dutt from Vastav | अब्रार काझीने संजय दत्तच्या 'वास्तव'मधील भूमिकेतून घेतली प्रेरणा
अब्रार काझीने संजय दत्तच्या 'वास्तव'मधील भूमिकेतून घेतली प्रेरणा

ठळक मुद्दे 'गठबंधन' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलामराठी मुलगा रघुच्या भूमिकेत अब्रार काझी


कलर्स वाहिनीवर 'गठबंधन' ही गँगस्टरवर आधारीत मालिका लवकरच दाखल होत आहे. या मालिकेत मराठी मुलगा रघुची भूमिका अब्रार काझी साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने अभिनेता संजय दत्तच्या वास्तव चित्रपटातून प्रेरणा घेतली आहे. 

मुंबई मध्ये जन्मलेला आणि मोठा झालेला रघू बॉलीवूडचा मोठा चाहता आहे पण त्याच्या जीवनात काहीही महत्वाकांक्षा नसते. मनाने आईचा मुलगा असलेल्या या मुलाची सर्वात मोठी ताकत त्याची आईच आहे आणि ती त्याची कमजोरीसुद्धा आहे, त्यामुळे त्याने रिअल इस्टेट बिल्डर कडून पिळवणूक करून पैसे कमविण्याचा धंदा निवडला आहे. वास्तविक जीवनात अब्रार काझी त्याच्या पडद्यावरील रघूच्या भूमिकेपेक्षा वेगळा आहे, त्यामुळे त्या पात्राच्या अंतरंगात शिरण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागले आहेत. त्याने वास्तव सिनेमा पाहिला आहे आणि त्यातील संजय दत्तच्या भूमिकेतून त्याला प्रेरणा मिळाली. 
सूत्रांच्या माहितीनुसार, अब्रार त्या पात्राचे योग्य उच्चार करण्यासाठी सराव करताना दिसत होता. त्याचप्रमाणे त्याने संजय दत्त सारखे चालायला आणि सेटवरील प्रत्येकाशी तसे बोलायला सुद्धा सुरूवात केली. या भूमिकेविषयी बोलताना अब्रार म्हणाला, जेव्हा मला या भूमिकेविषयी विचारले होते तेव्हा ते पात्र माझ्या वास्तविक जीवनातील व्यक्तिमत्वापेक्षा वेगळे असल्यामुळे मला ही भूमिका आव्हानात्मक वाटली. निवेदन ऐकल्यानंतर मला ती वास्तव मधील संजय दत्तच्या पात्राशी संबंधित वाटली आणि तशी भूमिका साकारणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. कारण
मी संजय दत्तचा खूप मोठा चाहता आहे. या भूमिकेमुळे मला तो सिनेमा अनेक वेळा पाहण्याची संधी मिळाली आणि गठबंधन मधील माझे रघू हे पात्र चांगले साकारता आले. 
जय मेहता प्रोडक्शन निर्मित 'गठबंधन' मालिका १५ जानेवारीला रात्री 9.00 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: Abrar Kazi took inspiration from the role of Sanjay Dutt from Vastav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.