Abhishek Verma's 'Ye Hai Mohabbatein' series, Comeback, but not in Aditya's second play | अभिषेक वर्माचे ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत कमबॅक, मात्र आदित्यच्या नाही तर दुसऱ्या भूमिकेत
अभिषेक वर्माचे ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत कमबॅक, मात्र आदित्यच्या नाही तर दुसऱ्या भूमिकेत

ठळक मुद्देअभिषेक वर्मा पुन्हा दिसणार ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत अभिषेक वर्मा साकारणार युगची भूमिका

‘स्टार प्लस’वरील ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत अभिनेता अभिषेक वर्माने पूर्वी इशिता (दिव्यांका त्रिपाठी) आणि रमण भल्ला (करण पटेल) यांचा मुलगा आदित्य याची भूमिका साकारली होती. पण त्याच्या व्यक्तिरेखेचा अंत घडविण्यात आल्याने अभिषेक काही काळ मालिकेतून बाहेर गेला होता. पण आता तो या मालिकेत एका नव्या भूमिकेद्वारे पुन्हा परतणार आहे.

मालिकेच्या कथानकाला लवकरच एक मोठी कलाटणी मिळणार असून त्यानंतर युग नावाच्या व्यक्तिरेखेद्वारे त्याचे मालिकेत पुनरागमन होणार आहे. यासंदर्भात अभिषेक म्हणाला, “ये है मोहब्बतें मालिकेत मला पुन्हा भूमिका रंगविण्यास मिळाल्याने मी अगदी हरखून गेलो आहे. या मालिकेत परतल्यावर मला स्वगृही परतल्यासारखे वाटत आहे. दिव्यांका मॅडम आणि करण सर यांच्याशी माझे अतिशय निकटचे नाते तयार झाले असून मला आता पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर एकत्र भूमिका रंगविण्यास मिळणार आहे. मालिकेत मी त्यांच्या मुलाची भूमिका साकारीत असल्याने माझे त्यांच्याशी अगदी घट्ट नाते निर्माण झाले होते.


आपल्या व्यक्तिरेखेविषयी अभिषेकने सांगितले, “यावेळी मी युग या एका मध्यमवर्गीय पण अतिशय महतत्वाकांक्षी आणि चित्रपट वेड्या तरुणाची भूमिका साकारणार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत आपला मुद्दा पटवून देण्यासाठी चित्रपटांची नावे घेऊन त्यातील प्रसंगांचे वर्णन करीत असतो. तो रणवीर सिंगचा जबरदस्त चाहता आहे. मी खरोखरच याच मालिकेत पुन्हा एक भूमिका रंगवीत आहे, यामुळे फारच उत्साहित झालो आहे. मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो आणि आता ही भूमिका साकारण्यास मी उत्सुक झालो आहे.”


Web Title: Abhishek Verma's 'Ye Hai Mohabbatein' series, Comeback, but not in Aditya's second play
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.