Abhijit Khandkekar, wife, Sukhda, is doing this place, Waxenjoy, see photo | अभिजीत खांडकेकर पत्नी सुखदासह या ठिकणी करतोय व्हॅकेशन एन्जॉय,पाहा फोटो

छोट्या पडद्यावरील मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. गुरुनाथ, राधिका आणि शनायाची जुगलबंदी असलेली ही मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा विशेष आणि खास आहे. मग ती गुरुनाथ म्हणजेच गॅरी असो किंवा त्याच्या पैशावर लट्टू झालेली शनाया असो, किंवा मग या दोघांना धडा शिकवणारी गुरुनाथ सुभेदारची बायको राधिका असो.प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या मालिकेत गॅरी म्हणजेच गुरुनाथ ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर याने साकारली आहे. सध्या गुरूनाथ म्हणजेच अभिजीत दुबईमध्ये मस्त व्हॅकेशन एन्जॉय करतोय.नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत अभिजीत पत्नी सुखदासह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.अभिजीत आणि सुखदानेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.त्यात दोघेही जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर फोटो काढण्याच आनंद लुटताना पाहायला मिळतंय.

छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे.

नुकतेच एका जाहिरातीसाठी सुखदा खांडकेकरचा Glamorous अंदाज पाहायला मिळाला.यावेळी व्हाईट कलरच्या गाऊन तिने परिधान केला होता.या गाऊनमध्ये तिचे सौदर्य कमालिचे खुलून आल्याचे पाहायला मिळत आहे.व्हाईट कलरच्या गाऊनमध्ये सुखदाचा अंदाज तितकाच घायाळ करणारा आहे.त्यामुळे सुखदाने हे फोटो शेअर करताच तिला तिच्या चाहत्यांकडून खुप सारे कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.तर दुसरीकडे पती अभिजित खांडकेरने देखील  Love U अशी कमेंट देत तिचे खूप कौतुक केले आहे.त्यामुळे सुखदाने फक्त अभिजितलाच नाहीतर इतर चाहत्यांनाही आपल्या लूकने क्लिन बोल्ड केल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Abhijit Khandkekar, wife, Sukhda, is doing this place, Waxenjoy, see photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.