Abhijeet Khandkekar openly opened the door to my husband's wife | ​माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकरने खुल्लम खुल्ला केले या अभिनेत्रीला किस

मालिकांचे चित्रीकरण म्हटले की कलाकारांना त्यांच्या दिवसातील १२ तासांहून अधिक वेळ यासाठी द्यावा लागतो. त्यामुळे ते त्यांच्या घरापेक्षाही अधिक वेळ हे मालिकेच्या सेटवर घालवतात. अनेकवेळा मालिकेच्या टीममधील कलाकार हे एखाद्या कुटुंबाप्रमाणेच बनते. चित्रीकरणाच्या दरम्यान असलेल्या फावल्या वेळात तर हे कलाकार मजा मस्ती करताना देखील दिसतात. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन आता कित्येक महिने झाले आहेत. त्यामुळे या मालिकेतील सगळे कलाकार हे एकमेकांचे खूपच चांगले मित्रमैत्रीण झाले आहेत. ते नेहमीच चित्रीकरणाच्या दरम्यान खूप मजा-मस्ती करत असतात आणि या मस्तीचे फोटो, व्हिडिओ त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटला पोस्ट करत असतात. 
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत जेनीच्या भूमिकेत असलेल्या शर्मिला राजारामने सोशल मीडियावर नुकताच या मालिकेच्या मेकअप रूममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत या मालिकेतील गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर एका अभिनेत्रीला चक्क किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला नक्कीच सगळ्यांना धक्का बसतो. पण हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की तो केवळ एका विगसोबत मस्ती करत आहे आणि तिथे शर्मिला केवळ उभी आहे. शर्मिलाची उंची कमी असल्याने काय सुरू आहे हे आपल्याला कळतच नाही. या व्हिडिओच्या शेवटी अभिजीत आणि शर्मिला जोरजोरात हसताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच हिट झाला आहे. 
माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील गुरूनाथ म्हणजेच गॅरी, शनाया, राधिका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडतात. ही मालिका दिवसेंदिवस चांगलीच लोकप्रिय होत आहे. या मालिकेत राधिका आणि गुरूनाथ हे पती-पत्नी असून शनाया ही गुरूनाथची प्रेयसी आहे. या मालिकेत सुरुवातील राधिका ही अतिशय साधीसुधी तर शनाया ही अतिशय फॅशनेबल असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. पण आता राधिकाचा देखील मेकओव्हर करण्यात आला आहे. 


 


Also Read : ही मराठमोळी अभिनेत्री लग्नाच्या आधी राहायची लिव्ह इन मध्ये
Web Title: Abhijeet Khandkekar openly opened the door to my husband's wife
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.