Aastad Kale and Titkicha Tawde took delight in the rainy season | ​अस्ताद काळे आणि तितिक्षा तावडे यांनी घेतला पावसाचा मनमुराद आनंद

सरस्वती या मालिकेत अस्ताद काळे राघव या भूमिकेत तर तितिक्षा तावडे प्रेक्षकांना सरस्वती या भूमिकेत पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपर्यंत सरस्वती आणि राघवमधील खूप चांगली केमिस्ट्री प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत होती. पण आता सरस्वती आणि राघव यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. राघवचा मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना काही दिवसांपूर्वी मालिकेत पाहायला मिळाले होते. त्यामुळे अस्ताद काही दिवस तरी या मालिकेचे चित्रीकरण करत नव्हता. पण आता या मालिकेत राघवची रि-एंट्री झाली आहे. सरस्वतीनेच राघवला मारण्याचा प्रयत्न केला होता असा त्याचा समज झाला आहे आणि त्यामुळे तो तिचा तिरस्कार करू लागला आहे. मालिकेत राघव आणि सरस्वती यांच्यात सध्या सगळे काही आलबेल नसले तरी खऱ्या आय़ुष्यात ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.
सध्या पावसाचा मोसम असून जोरदार पाऊस सगळीकडे पडत आहे. त्यामुळे खूपच चांगले वातावरण सगळीकडे आहे. या वातावरणाचा आनंद नुकताच अस्ताद आणि तितिक्षा या दोघांनी मिळून लुटला. 
काही दिवसांपूर्वी सरस्वती या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना मस्त आभाळ भरून आले होते. त्यामुळे त्यांनी मालिकेच्या सेटवर मस्त कांदा भजीची पार्टी केली. एवढेच नव्हे तर सरस्वती आणि तितिक्षा यांनी भुट्टा खाण्याचा आनंद लुटला. पावसाळ्यात खरे तर भुट्टा खाण्याची एक वेगळीच मजा असते. इतर वेळी देखील बाहेर पाऊस पडत असल्यास सरस्वती या मालिकेतील सगळेच कलाकार मिळून खूप धमालमस्ती करत असतात. 

Also Read : ​सरस्वतीचा नवा लूक तुम्ही पाहिला का?
Web Title: Aastad Kale and Titkicha Tawde took delight in the rainy season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.