Aastad Kale is with the actress, Big Boss confesses in Marathi | ​अस्ताद काळे या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात, बिग बॉस मराठीमध्ये दिली कबुली

अस्ताद काळे सरस्वती या मालिकेत राघव ही भूमिका साकारत होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत होती. या मालिकेतील त्याची आणि सरस्वतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. अस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता अस्ताद एका रिअॅलिटी शो कडे वळला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात अस्ताद सध्या आपल्याला पाहायला मिळत असून प्रेक्षकांना तो चांगलाच आवडत आहे.
अस्ताद हा प्रेक्षकांचा लाडका असल्याने त्याच्या खऱ्या आयुष्यात काय सुरू आहे याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना नेहमीच लागलेली असते. अस्तादची एक प्रेयसी असून ती अभिनयसृष्टीशीच संबंधित आहे. अस्तादनेच बिग बॉस मराठीच्या घरात ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. बिग बॉस मराठीत विकेंडच्या एपिसोडमध्ये त्याच्या एका फॅनने त्याला प्रपोज केले होते. ती म्हणाली होती की, तुझी कोणी गर्लफ्रेंड नसेल तर मला तुझी गर्लफ्रेंड व्हायला आवडेल त्यावर उत्तर देताना स्वप्ना त्याची प्रेयसी असल्याचे त्याने सांगितले होते.
ही स्वप्ना म्हणजे स्वप्नाली पाटील असून तिने पुढचे पाऊल या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात असल्याचे म्हटले जात आहे. 
अस्तादने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अग्निहोत्र या मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेत्री प्राची मते त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच कल्पना होती. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राचीचे कॅन्सरने निधन झाले. प्राचीला बोनमॅरो कॅन्सर होता आणि तिचा आजार अंतिम टप्प्यात असताना त्याचे निदान झाले होते. प्राचीची तब्येत दिवसेंदिवस ढासाळायला लागली होती. त्यामुळे तिने मालिकांमध्ये काम करणे देखील सोडले होते. तिच्या शेवटच्या दिवसांत अस्ताद तिच्या सतत सोबत होता. तिचे निधन होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. 

Also Read : या कारणामुळे अस्ताद काळेने बदलली त्याची हेअरस्टाईल
Web Title: Aastad Kale is with the actress, Big Boss confesses in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.