Aastad Kala will get special surprise! | आस्ताद काळेला मिळणार खास सरप्राईझ !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालदेखील रंगले फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य.या कार्यअंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले.शर्मिष्ठाच्या बहिणीने शर्मिष्ठाला तर भूषणच्या बायकोने भुषणला मार्गदर्शन केले आणि त्यांची हिंमत देखील वाढवली.भूषणच्या बायकोने रेशमचे आभार मानले कि ती मोठ्या बहिणीसारखी भूषणच्या मागे उभी आहे तसेच इतर सदस्यांना हे देखील सांगितले कि, भूषणला कटकारस्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे. मेघाची आई आणि मुलगी मेघाला भेटण्यासाठी घरी गेल्या.मेघाच्या मुलीने मेघ आणि सईला एक निरोप देखील दिला. तेंव्हा बघायला विसरू नका आज फ्रीझ – रीलीझ टास्कमध्ये काय घडणार? तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार ? या सगळ्या रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहे.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस सदस्यांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या कार्या अंतर्गत सदस्यांची तीन टीम मध्ये विभागणी करण्यात येणार आहे. टीम A – दात, टीम B डाबर रेड पेस्ट आणि टीम C कॅव्हिटी असणार आहेत. टीम A ला म्हणेच दातांना टीम C मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटी पासून वाचविण्याची टीम B ची जबाबदारी असणार आहे. आता या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आगामी भागात उलडगणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पाडली जाणार आहे असे बिग बॉसने सदस्यांना सांगण्यात आले होते.त्यानुसारच  नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली होती.या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे होते.दिलेल्या टास्कमध्ये सदस्याला नॉमिनेट करत त्याच्या चेहऱ्याला शाईची पावडर फासणे अनिवार्य होते. अशा पद्धतीने अतरंगी पद्धतीने ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली होती.
Web Title: Aastad Kala will get special surprise!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.