2 Junkie's joke at Mad's DJ Night | 2 मॅडच्या डी जे नाईट मध्ये तरुणाईचा जल्लोष

कलर्स मराठीवरील 2मॅड महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. 2मॅड कार्यक्रमाला तरुणांची आणि डान्सप्रेमींची विशेष पसंती लाभली आहे. डान्सचा जलवा 2मॅड च्या स्टेजवर दिसू लागला आहे आणि महाराष्ट्रातील उत्तमोत्तम डान्सर रसिक प्रेक्षकांना कलर्स मराठीवर पाहायला मिळत आहेत. हा डान्सचा मॅडनेस इतका वाढला कि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पावधीतच संचारला. 
     
           नुकतेच  कलर्स मराठी तर्फे 2मॅड ची डी जे नाईट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर जल्लोषात साजरा करण्यात आला. पुण्यातील प्रमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे  यामध्ये सहभाग नोंदविला. तसेच या डी जे नाईट मध्ये 2मॅडचे स्पर्धक  सुरज आणि तुषार यांनी सलमान एॅक्ट सादर केला, सोनलने आॅडिशन अ‍ॅक्ट सादर केला आणि प्रतिक्षाने मेगा आॅडिशन अ‍ॅक्ट सादर केला. पुण्यातील तरुणाई बरोबर 2मॅडच्या स्पर्धकांचा मिलाफ काही औरच होता म्हणूनच या डी जे नाईटला छानशी रंगत आली. मुख्यत: 2मॅडची नाईट हि तरुणाई डोळ्यसमोर ठेवून आखण्यात आली होती. या नाईट मध्ये अफलातून असे म्युसिक, मॅड डान्स आयोजित करण्यात आले होते, तसेच डान्स या कलेबद्दल तरुणाईची मतं जाणून घेण्यासाठी ग्राफिटी वॉल ची आकर्षक निर्मिती करण्यात आली होती. 
     
             या डी जे नाईट मध्ये सहभागी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या त्या अश्या कि,  हि डी जे नाईट आम्हाला खूप आवडली, खूप सा?्या वेगवेगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या, खरोखरच डान्सचा मॅडनेस आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आला. 2मॅडच्या स्पर्धकांना पाहून खूप छान वाटलं आम्ही त्यांच्यासोबत डान्स केला आणि सेल्फी सुद्धा काढला. 2मॅड शो बद्दल आम्ही खूप उत्साही होतो अन आज या शो मधल्या स्पर्धकांसोबत सहभाग घेता आला तसेच अशी डी जे नाईट आयोजित केल्याबद्दल कलर्स मराठीचे खूप आभारी आहोत.  

Web Title: 2 Junkie's joke at Mad's DJ Night
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.