Before the 10th breath started, Salman Khan gave gifts to his fans | ​दस का दम सुरू व्हायच्या आधी सलमान खानने त्याच्या चाहत्यांना दिले हे गिफ्ट

दमदार सलमान खान २०१८ मधील सर्वात जास्त प्रतिक्षित कार्यक्रम दस का दम घेऊन येत आहे. हा कार्यक्रम तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे. त्याचे चाहते हा कार्यक्रम सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येण्याआधी सलमानने त्याच्या चाहत्यांना खूपच छान गिफ्ट दिले आहे. या कार्यक्रमाचा एक म्युझिक व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान दस का दमच्या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हे गाणे ऐकल्यावर तर सलमानचे फॅन्स प्रचंड खूश होणार आहेत. कारण तुम्ही हे गाणे ऐकल्यावर तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे की, हे गाणे दुसर्‍या तिसर्‍या कोणी नाही तर खुद्द सलमाननेच गायले आहे. 
दस का दम या कार्यक्रमाच्या गाण्याला आपला आवाज देण्याची कल्पना ही सलमानचीच होती. या कार्यक्रमाच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, तो एक उत्स्फूर्त निर्णय होता आणि आता हे गाणे आम्ही ऐकल्यावर तर आम्ही सगळेच खूश झालो आहोत. सुरुवातीला सलमान या व्हिडिओतील फक्त काही ओळी डब करणार होता. पण त्यानंतर त्याने ते संपूर्ण गाणे गायचेच ठरवले. हे गाणे मस्तच जमून आले आहे.”
दस का दम या कार्यक्रमाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये सलमान खान नृत्य देखील करताना दिसणार आहे. या दमदार गीताचे नृत्यदिग्दर्शन मुदस्सर खानने केले आहे. त्याने याआधी देखील सलमानच्या काही सुपरहिट चित्रपटांतील गीतांचे नृत्यदिग्दर्शन केले असून सलमानसोबत पुन्हा काम करायला मिळाले असल्याने तो प्रचंड खूश झाला आहे. सलमानच्या दस का दम या कार्यक्रमाच्या म्युझिक व्हिडिओमधील स्टेप्स या अतिशय सोप्या आणि चटकन अनुकरण करता येतील अशा असणार आहेत. या गीताचे नृत्यदिग्दर्शन सर्वांनाच आवडेल अशी मुदस्सरला खात्री आहे. 
दस का दम हा कार्यक्रम प्रेक्षकांना ४ जून पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

Also Read : ​​या कारणामुळे सलमान खानचे फॅन्स झाले खूश, म्हटले सलमान खान सिंगलच बरा...
Web Title: Before the 10th breath started, Salman Khan gave gifts to his fans
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.