सावधान! तुम्ही 'ही' चूक केल्यास कुणीही वाचू शकतं तुमचं सीक्रेट WhatsApp चॅटींग!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 04:12 PM2019-01-12T16:12:34+5:302019-01-12T16:18:03+5:30

जर तुम्ही आधी तुमच्या वेगळ्याच मोबाइल नंबरवर WhatsApp चालवत असाल आणि आता तो तुम्ही बंद केला आहे.

Your whatsapp chat could be read by someone | सावधान! तुम्ही 'ही' चूक केल्यास कुणीही वाचू शकतं तुमचं सीक्रेट WhatsApp चॅटींग!

सावधान! तुम्ही 'ही' चूक केल्यास कुणीही वाचू शकतं तुमचं सीक्रेट WhatsApp चॅटींग!

Next

(Image Credit : commons.wikimedia.org)

जर तुम्ही आधी तुमच्या वेगळ्याच मोबाइल नंबरवर WhatsApp चालवत असाल आणि आता तो तुम्ही बंद केला असेल. म्हणजे तो नंबर तुम्ही आता वापरत नाहीत आणि सरेंडर केला आहे. तर वेळीच सावध व्हा. कारण तुमचं सीक्रेट चॅट धोक्यात आहे. तुमचं त्या मोबाइल नंबरवरील चॅटींग कुणीही वाचू शकतं. हे एका बगमुळे होत आहे. याची ओळख Piunikaweb ने पटवली आहे. तुमचा जुना मोबाइल नंबर दुसऱ्या कुणाला मिळाला आणि त्या व्यक्तीने त्या मोबाइल नंबरवर  WhatsApp सुरु केले तर त्यात तुमचं जुनं चॅटींग प्लेन टेक्स्टमध्ये येऊ शकतं. 

प्लेन टेक्स्टमध्ये WhatsApp चं सीक्रेट चॅट

असंच एक प्रकरण Amazon ची कर्मचारी एबी फुलरसोबत झालं आहे. फुलरने ट्विटरवर हे सगळं प्रकरण उघड केलं आहे. फुलरने सांगितले की, जेव्हा तिने नव्या स्मार्टफोनमध्ये नवीन मोबाइल सीम टाकून WhatsApp लॉगीन केलं तेव्हा तिला धक्का बसला. ज्या व्यक्तीचा हा आधी मोबाइल नंबर होता त्याचं सर्व चॅटींग बघू आणि वाचू शकत होती. 



WhatsApp Bug मुळे प्रायव्हसी धोक्यात

या घटनेमुळे एबी फुलर आता याबाबत चिंतेत आहे की, तिच्या जुन्या मोबाइल नंबरवरील चॅटींग कुणी वाचलं तर नसेल ना. असा अंदाज लावला जात आहे की, एका WhatsApp Bug मुळे काही यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. एबीने स्पष्ट केलं की, तिचा स्मार्टफोन नवीन होता, सेकंड हॅंन्ड नाही.



WhatsApp चा दावा, ४५ दिवसात डिलीट होतो डेटा

WhatsApp ने त्यांच्या वेबसाइटवर माहिती दिली आहे की, जेव्हा तुम्ही तुमचा मोबाइल नंबर बदलता तेव्हा तुम्ही तुमचं जुनं अकाऊंट डिलीट केलं पाहिजे. जर तुम्ही जुनं अकाऊंट डिलीट करत नाहीत आणि त्याचा वापर करत नाहीत तर ४५ दिवसांच्या आत तुमच्या जुन्या मोबाइल नंबरशी संबंधित डेटा ऑटोमॅटिक डिलीट होतो. धक्कादायक बाब म्हणजे एबी ४५ दिवसांपेक्षा जास्त काळापासून नव्या मोबाइल नंबरचा वापर करत होती. 

Piunikaweb ने स्पष्ट केले की, एबी फुलरने त्या व्यक्तीचं सर्व चॅटींग डिलीट केलं आहे. पण तरिही हा प्रायव्हसीशी निगडीत मोठा मुद्दा आहे. यावर WhatsApp कडून मात्र अजून काहीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये.

Web Title: Your whatsapp chat could be read by someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.