Xiaomi Redmi 6 Pro gets massive price cut in India for the first time | Redmi 6 Pro स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत...
Redmi 6 Pro स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत...

ठळक मुद्देRedmi 6 Pro स्मार्टफोनची किंमत स्वस्त स्मार्टफोन ग्राहकांसाठी अॅमेझॉन, mi.com आणि mi home वर उपलब्धस्मार्टफोन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता

नवी दिल्ली : शाओमी कंपनीने आणखी एका स्मार्टफोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेलेया माहितीनुसार, Redmi 6 Pro स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. Redmi 6 Pro स्मार्टफोन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आल्यानंतर ग्राहकांना 9,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच, Redmi 6 Pro स्मार्टफोन ग्राहकांसाठी अॅमेझॉन, mi.com आणि mi home वर उपलब्ध आहे.

Redmi 6 Pro स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला. त्यावेळी 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये होती. तर, दुसऱ्या व्हेरियंट स्मार्टफोनमध्ये  4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत एक हजार रुपयांची कपात करण्यात आली असून आता हा स्मार्टफोन 11,999 रुपयांना मिळणार आहे.

शाओमी कंपनीचा Redmi 6 Pro हा स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड, ब्ल्यू आणि रेड कलरमध्ये आहे. तसेच, नॉच डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन 5.84 इंचाचा आहे. तर ऑपरेटिंग सिस्टिमसाठी क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्रॉफीसाठी ड्युअल कॅमेरा आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा आहे. कॅमेऱ्यामध्ये इंटलिजिन्स आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेब्लाइजेशन फीचर्स दिले आहेत. याचबरोबर, या स्मार्टफोनमधील बॅटरीची क्षमता 4,000mAh इतकी आहे.   
  
 

English summary :
Xiaomi Company has decided to reduce the cost of another smartphone. According to information provided by the company, Redmi 6 Pro has reduced the cost of smartphones. The Redmi 6 Pro was launched in September. Now, after the deduction of this smartphone price, customers will get Rs 9,999. Redmi 6 Pro is available for customers on Amazon, mi.com and mi home.


Web Title: Xiaomi Redmi 6 Pro gets massive price cut in India for the first time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.